ब्रेकींग! वेणूगोपाल धूत यांना सीबीआयने केली अटक

    26-Dec-2022
Total Views |

Venugopal Dhoot
 
 
मुंबई : व्हीडिओकॉनचे सर्वेसर्वा वेणूगोपाल धूत यांना सीबीआयने ताब्यात घेतले आहे. यापूर्वीच दीपक कोचर आणि चंदा कोचर यांना सीबीआयने अटक केली होती. वेणूगोपाल धूत यांनी घेतलेले २१०० रुपयांचे कर्ज माफ करून बँकेच्या एनपीएमध्ये दाखविले होते. वेणूगोपाल यांना कर्ज देण्यासाठी ६३ कोटी रुपये चंदा कोचर यांनी घेतले. कोचर यांनी हे पैसे दीपक कोचर यांच्या कंपनीच्या खात्यात वळते केले होते.
 
 
ज्यावेळी हे ऋण फेडण्याची वेळ आली तेव्हा २१०० कोटी रुपये त्यांना परतफेड करता आली नाही. या आर्थिक अनियमिततेच्या वेळी कोचर या आयसीआयसीआय बँकेच्या अध्यक्षपदी होत्या. त्यांच्याच काळात २१०० कोटी इतकी रक्कम एनपीएमध्ये वर्ग करण्यात आली. आर्थिक अनियमितता आणि व्हीडिओकॉनला देण्यात आलेले कर्ज परतफेड करताना अनेक गोष्टींत अफरातफर झाली. गेल्या आठवड्यात सीबीआयने कोचर दाम्पत्याला अटक केली होती. सीबीआयने त्यांना मुंबईतील निवासस्थानाहून अटक करण्यात आली होती. लवकरच मुंबई सत्र न्यायालयात सीबीआय कोठडी मिळविण्यासाठी हजर केले जाणार आहे.
 
 
चंदा कोचर यांच्या वकिलांनी वेणूगोपाल धूत यांच्या अटकेबद्दल प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर हे सीबीआयने पाऊल उचलले आहे. कोचर दाम्पत्याची चौकशी करण्यासाठी कोठडी वाढविण्यात येईल. तसेच धूत यांचीही कोठडी मिळविण्यासाठी सीबीआय प्रयत्नशील राहिल. नियमबाह्य पद्धतीने चंदा कोचर यांच्या कार्यकाळात कर्जवाटप झाले. यानंतर ऑडीटमध्ये मोठा गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले. सर्वसामान्य बँक ग्राहकांच्या खात्यातील पैसा अशाप्रकारे वापरल्याचे उघडकीस आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
 
 
सीबीआय आता तीनही आरोपींना समोरासमोर बसवून पुढील चौकशी करणार आहे. चंदा कोचर या तत्कालीन काळात देशातील एक सर्वात शक्तीशाली महिलांपैकी एक मानल्या जात होत्या. त्यांच्या याच पदाचा गैरवापर व्हीडिओकॉनसाठी केला होता. व्ही़डिओकॉनतर्फे कोचर यांना आणखी कुठल्या प्रकारची प्रलोभने दाखविण्यात आले होते का? या सर्वच प्रश्नांची उत्तरे सीबीआय आपल्या तपासात शोधणार आहे.