पिंपरीत राज्यातील पहिले स्मार्ट टॉयलेट

    02-Dec-2022
Total Views |
 
स्मार्ट टॉयलेट
 
 
 
 
पुणे : पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीमार्फत शहरातील नागरिकांसाठी जगताप डेअरी चौक परिसरात पीपीपी तत्वावर उभारण्यात आलेल्या स्मार्ट टॉयलेटचे (स्मार्ट सार्वजनिक शौचालय) सुरु करण्यात आले आहे. राज्यातील पीपीपी तत्वावर (सार्वजनिक खासगी भागीदारी) हा पहिलाच प्रयोग असल्याचा दावा करण्यात आला आहे.
 
 
पिंपरी चिंचवड महापालिकेचे प्रशासक तथा स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांच्या उपस्थित लोकार्पण करण्यात आले. स्मार्ट सिटीचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादव, मनोज सेठिया, कार्यकारी अभियंता लक्ष्मीकांत कोल्हे उपस्थित होते.
 
 
15 वर्षाच्या कालावधीकरीता महिला व पुरुष असे स्वतंत्र कक्ष असलेले स्मार्ट सार्वजनिक शौचालय उभारण्यात येत आहे. 26 ठिकाणी ई-टॉयलेटचे काम सूरू आहे. जानेवारी 2023 पर्यंत संपूर्ण ई-टॉयलेटचे काम पूर्ण करण्यात येणार आहेत. ही इलेक्ट्रॉनिक पद्धतीने काम करणारी शौचालये आहेत. यामध्ये फ्लशिंग ऑपरेट करणे सोपे असून शौचालयाचा दरवाजा उघडल्याने टॉयलेट पॅन आपोआप फ्लश होते. अनेक अतिरिक्त इंटिग्रेटेड सिस्टीम आणि सेन्सर्स देखील समाविष्ट आहेत.
 
 
असे काम करेल स्मार्ट टॉयलेट
 
ऑटोमॅटिक फ्लशिंग सेन्सर, व्हॉईस असिस्टंट, फॅन, सीलिंग लाईट, पॉवर बॅकअप आदी सुविधा आहेत. लाल रंगाचा दिवा पेटत असेल तर आत कोणीतरी व्यक्ती असेल आणि हिरव्या रंगाचा सिग्नल असेल तर समजून घ्या की, हे शौचालय रिकामे आहे. प्रवेश करण्यापूर्वी अनेक प्रकारचे इंडिकेटर लावले जातात. जेणेकरून किती पाणी आहे हे कळते. स्मार्ट टॉयलेटच्या वरती पाण्याची टाकी बसवण्यात आली असून 10 वेळा वापर केल्यानंतर शौचालय स्वयंचलित तंत्रज्ञानाने फ्लश केला जाईल आणि पूर्णपणे स्वच्छ होईल. यामध्ये व्हॉईस ओव्हरद्वारे लोकांना त्याच्या वापराबाबत माहितीही दिली जाते.