नागपूर : लवासा हिल स्टेशन प्रकरणी राज्यातील सर्व यंत्रणा कामाला लावून आमची चौकशी करा, असा इशारा अजित पवार यांनी सरकारला दिला आहे. आम्हाला चौकशी झाल्यास काही अडचण नाही. केंद्रीय आणि राज्यस्तरीय यंत्रणा कामाला लावून तुम्ही या प्रकरणाची चौकशी करा, असे अजित पवार म्हणाले.
"राज्यात लागू झालेल्या लोकायुक्त कायद्याचे आम्ही स्वागत करत आहोत. त्यातील योग्य अयोग्य काही बाबी आहेत का? ते पाहून चर्चा करु, जर काही चुकीचं असेल तर नक्कीच आम्ही त्याला विरोध करु. " असं पवार यावेळी म्हणाले.