अंधार तरी किती उगळायचा?

    15-Dec-2022   
Total Views |
Sushma Andhare


काट्याच्या अणीवर वसलेली ती तीन गावे, दोन ओसाड आणि एक वसलेच नाही. आताच्या संदर्भात म्हणायचे तर यातल्या दोन गावाची ओळख मशाल आणि घड्याळ का? आणि एका गावाची ओळख हाताचा पंजा का? तर अशी दोन ओसाड गावे आणि न वसलेल्या गावाची सुभेदारी घेऊन गावभर अवैचारिक अंधार उधळत ते कोण बरे किंचाळत आहे? अरे आता आवाज कुणाचा? आणि कुणासाठी? प्रश्न विचारला तर यावर काही लोक म्हणाले जे लोक काही कारणास्तव तमाशा किंवा मुजर्‍याला जाऊ शकत नव्हते, ज्या लोकांना दर्जेदारमनोरंजन पाहून काही कळण्याचा प्रश्नच नव्हता, अशा ओवाळून टाकलेल्या मंडळींचे मनोरंजन करण्यासाठी सुष्मीच्या भाषणाशिवाय ‘बेस्ट’ पर्यायच नाही. ते किंचाळणे तिचेच आहे. तर काही लोक म्हणाले की, “सुष्मीला भराभर प्रश्न पडतात.” सुष्मीला प्रश्न पडला होता ज्ञानेश्वरांनी रेड्याला वेद वदवले म्हणून. हिला प्रश्न पडला होता. संत तुपाची वाटी घेऊन गाढवाच्या पाठी का पळाले (इथेही हिने संतांचे नाव चुकीचे घेतले)? श्रीकृष्ण बिझी का आहे तर तो असंख्य गोपींबरोबर आहे म्हणून बिझी आहे, असा प्रश्न हिला पडला. हिनेच नवरात्रीमध्ये देवीबद्दल द्वयर्थी अश्लिल वक्तव्य केले होते. हे सगळे प्रश्न समोर बसलेल्या तिच्यासारखीच बौद्धिक कुवत असलेल्या लोकांचे मनोरंजन करण्यासाठी, त्यांना खूश करण्यासाठी सुष्मीला पडले. त्यांना आवडेल अशा हिणकस सुरात तीच किंचाळत असेल.”यावर काही लोकांचे म्हणणे, “आता ती उठा गटाची उपनेता झाली. पण उपनेता झाली म्हणून शून्य फरकही तिच्यात झाला नाही. नाक फेंदारत, डोळे मिचकावत, ओठांचे घाणेरडे विभ्रम करत, हातवारे करत अतिशय कर्कश आवाजातले अद्वातद्वा विखारी आणि किळस येईल असे बोलणे काही तिने सोडले नाही. हे कदाचित आश्चर्य नसेल पण आश्चर्य या गोष्टीचे आहे की, तिच्या या अशा बोलण्यावरही टाळ्या पिटणारे लोक तिला नव्या पक्षात भेटले. तीच किंचाळत असेल.” यावर काही लोकांचे म्हणणे होतेे की, “बेस्ट सीएम उद्धव ठाकरे साहेबांना उपनेत्या सुषमाताई अंधारेंचे बोलणे, विचार आवडतात तर कुणाला काय करायचे आहे?” वाचकहो, आवाज कुणाचा विचारल्यावर लोकांच्या अशा विविध प्रतिक्रिया आल्या. आणखीही बर्‍याच प्रतिक्रिया आहेत. पण अंधार तरी किती उगळायचा?

नेमाडे आणि चीन, नाते काय?


हिंदू: जगण्याची समृद्ध अडगळ’ असे अतिशय निरस, कंटाळवाणे आणि तर्कहिन पुस्तक लिहिलेल्या आणि तरीही या पुस्तकावरून चर्चेतअसलेल्या भालचंद्र नेमाडेंचे नाव वाचनबिचन करणारे लोक ऐकून असणारच. तर अशा नेमाडेंनी आता अक्कल पाजळली आहे की, चीनला शत्रू म्हणतो ते चुकीचे आहे. ते देखील आपले म्हणजे भारतचे आहे. चीनला दोष देणे चुकीचे आहे. नेमाडे हे म्हणाले यात काही नवीन नाही. नेमाडे आणि त्यांच्या कंपूतील माणसांचे हेच म्हणणे असते आणि हे म्हणणे ही लोक विविध माध्यमातून भारतीय जनतेच्या डोक्यात भरवण्याचा प्रयत्नही करत असतात. नेमाडे प्रकरणावरून आठवले की कम्युनिस्ट कोण? यावर उत्तर देताना मिश्किलपणे लेखक विचारवंत रमेश पतंगे अनेक वेळा सांगतात की, चीनला पाऊस पडला तर भारतात रेनकोट घालणारेआणि चीनला थंडी पडली तर भारतात स्वेटर घालणारे लोक आहेत हे. थोडक्यात भारतात राहून चीनची तरफदारी करणारी ही मंडळी. यातही दोन गट आहेत एक छुपे माओ समर्थक असतात. पण भारतात माओवादाला उघड समर्थन करू शकत नाहीत. मग माओच्याऐवजी चीनचे गुणगाण गातात, तर दुसरा गट आहे जो वस्तीपातळीवरील गरीब भोळ्या अज्ञानी लोकांना सांगत फिरतो की, “भारतात बौद्धांची लोकसंख्या खूप कमी आहे. पण काळजी करू नका. चीनमध्ये आपण बहुसंख्य आहेात,” असे सांगून हा गट भोळ्या लोकांना धार्मिकदृष्ट्या चीनशी जोडू पाहतो. (प्रत्यक्ष अनुभव आणि सत्य घटनेवरूनच लिहिले आहे). या दोन गटापैकी नेमाडे कोणत्या गटात मोडत असतील बरं? मराठी वाचकांचे सर्वेक्षण केले तर नेमाडे खरेच विचारवंत किंवा लोकप्रिय दर्जेदार लिखाण करणारे साहित्यिक आहेत का? याचे उत्तर मिळेल. चीनशी इतक आंतरिक सूर जुळलेल्या व्यक्तिच्या लोकानुनय न मिळालेल्या साहित्यालाही पुरस्कार का मिळाले असतील? तर याचे तर्कात्मक विश्लेषण इतकेच करता येईल की, ‘ब्रेकिंग इंडिया’ व्यवस्थेमध्ये हिंदू समाज, श्रद्धा, भारत आणि त्याची संस्कृती, वारसा यांच्यावर टिकात्मक काहीही करणार्‍यांना पूर्वी सन्मानित करताना देशाने पाहिले होते. भालचंद्र नेमाडेंच्या बाबतीत असे काही असेल का? आता सर्वांत मूलभूत प्रश्न चीनशी नेमाडेंचे काय नाते असावे? हे नाते शोधणे गरजेचे आहे.




आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.