मुंबई : देशाचे माजी उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडूंना २५वा ‘श्री चंद्रशेखरेंद्र सरस्वती नॅशनल एमिनेन्स अवॉर्ड’(एसआयईएस) प्रदान करण्यात आला. हे पुरस्कार सार्वजनिक नेतृत्व, समुदाय नेतृत्व, विज्ञान आणि तंत्रज्ञान तसेच, सामाजिक विचारवंतांच्या क्षेत्रात देण्यात आले आहेत, ज्यांनी आपापल्या क्षेत्रात उत्कृष्ट योगदान दिले आहे. विविध प्रकारांतील इतर पुरस्कारांमध्ये केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान, प्रख्यात उद्योगपती रतन टाटा, प्रख्यात हृदयरोगतज्ज्ञ आणि पद्मविभूषण पुरस्कार विजेते डॉ. मार्तंड वर्मा शंकरन वलियनाथन, भारत सरकारचे वैज्ञानिक सल्लागार अजय सूद आणि प्रसिद्ध हरिकथा कलाकार विशाखा हरिदेखील आहेत.
याबाबत ट्विटरद्वारे व्यंकय्या नायडू यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. “मी हा पुरस्कार नम्रतेसह स्वीकारतो आणि माझ्या पालकांना रंगैरया नायडू आणि रमणम्मा तसेच माझ्या आजी-आजोबा यांना समर्पित करतो. ज्यांनी माझ्या बालपणी मला तयार केले आणि इतरांची काळजी घेण्याचे मूल्ये निर्माण केली.” श्री षण्मुखानंद चंद्रशेखरेंद्र सरस्वती सभागृह, मुंबई येथे २५व्या ‘एसआयईएस श्री चंद्रशेखरेंद्र सरस्वती नॅशनल एमिनेन्स अवॉर्ड-२०२२’मध्ये भाग घेऊन आणि माझे विचार व्यक्त करून घेण्यास आनंद झाला. २०व्या शतकात महास्वामींचे योगदान हा आध्यात्मिक पुनर्जागरणाचा उच्च बिंदू आहे. मला त्यांच्या नावाचा पुरस्कार मिळाला म्हणून मी नतमस्तक आहे. हा पुरस्कार मला त्यांच्याकडून मिळालेल्या उच्च मूल्यांच्या संरक्षणासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी माझे प्रयत्न सुरू ठेवण्यासाठी मोठी जबाबदारी आहे,” असे नायडूंनी म्हटले आहे.