"लगता हैं कल से फिर मैदान में उतरना पड़ेगा …"

- मोहित कंबोज यांचं सूचक ट्विट

    09-Nov-2022
Total Views |

मोहित कंबोज
 
 
मुंबई : पत्राचाळ घोटाळा प्रकरणात १०० दिवस तुरुंगात राहिल्यानंतर संजय राऊत यांना जामीन मंजूर झाला. यानंतर त्यांची तुरुंगातून सुटका देखील झाली. यादरम्यान, मोहित कंबोज यांनी देखील राऊतांच्या सुटकेवर प्रतिक्रिया देत केलेलं ट्विट चर्चेत आलं आहे. राऊत तुरुंगातून बाहेर येताच मोहित कंबोज यांनी "लगता हैं कल से फिर मैदान में उतरना पड़ेगा …", असं सूचक ट्विट करत इशारा दिला आहे.
 
 
मात्र, या ट्वीटमध्ये त्यांनी कोणाच्याही नावाचा उल्लेख केला नाही. परंतु, जेलमध्ये जाण्याआधी मोहित कंबोज विरुद्ध संजय राऊत असा संघर्ष कायम पाहायला मिळाला. विविध प्रकरणावरून संजय राऊत आणि कंबोज यांच्यामध्ये शाब्दिक युद्ध झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे राऊत बाहेर येताच हे ट्वीट केल्यामुळे आता पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे.