भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेतर्फे यापुढे सुधाकर राजे यांच्या नावे पाठ्यवृत्ती
07-Nov-2022
Total Views |
मुंबई : जेष्ठ पत्रकार व लेखक सुधाकर राजे यांचे २२ ऑक्टोबर २०२२ रोजी निधन झाले. त्यानिमित्त राष्ट्रीय पत्रकारिता कल्याण न्यास यांच्या मार्फत ६ नोव्हेम्बर रोजी सकाळी १०.३० वाजता श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या सभागृहात या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्व उपस्थित मान्यवर व्यक्तींनी सुधाकर राजे यांच्या विषयीच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी उत्तर प्रदेशचे भूतपूर्व राज्यपाल राम नाईक तसेच फिन्सचे राष्ट्रीय महासचिव ऍड बाळासाहेब देसाई यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. आयसिसीआर चे अध्यक्ष विजय सहस्त्रबुद्धे यांच्यासोबत सुधाकर राजे यांचे चिरंजीव ललित राजेही सपत्नीक उपस्थित होते.
विश्वसंवाद केंद्राचे कार्यवाह मोहन दोहोळीकर यांनी आपल्या आठवणी सांगताना हिंदू व्हिजन या मासिकाच्या वेळच्या आठवणी सांगताना त्यांनी आपल्या वसुधाकर राजेंच्या आयुष्याचे सर्व धागे उलगडून दाखवले. ते म्हणतात, " मराठी भाषेत आपण जे कार्य करतो ते फक्त महारासगटरातील जनतेसमोर पोहोचतात. परंतु इंग्रजी भाषेत जर विपुल लेखन केलं तर त्याचा फायदा अनेकांना होतो. हिंदुत्व आणि राजे या एका नाण्याच्या दोन बाजू, त्यामुळे त्यांचे हिंदुत्ववादी विचार विश्वव्यापी झाले."
ऍड बाळासाहेब देसाई आपल्या मनोगतात म्हणाले, " अफाट वाचन आणि अफाट लेखन या चार शब्दांत मी त्यांची ओळख करू देईन. त्यांची आजपर्यंत २२ पुस्तके प्रकाशित केली परंतु एकही पुस्तक दुसऱ्या पुस्तकाशी साधर्म्य साधणारं नव्हतं. त्यांनी हिंदुत्वाबद्दल लिहिलेच त्याच बरोबर, बुद्धिस्ट, इस्लाम, क्रिस्टिअनीती, दहशतवाद अशा अनेक विषयांना हात घातला. "
जेष्ठ पत्रकार अरविंद कुलकर्णी यांनीही आपली त्यांच्याबद्दलची मतं मांडली. त्याच बरोबर आपल्या एकत्रित आठवणींना त्यांनी यवसली उजाळा दिला. ते म्हणतात, " मला नेहेमी वाटायचे की हा माणूस बोलतो कमी, संघर्ष टाळतो, एकमेकांत स्नेहबंध जोडायचा प्रयत्न करतो आणि फिलॉसॉफिकल बोलतो. पण जशी ओळख झाली ताशा अनेक अजून चांगल्या गोष्टी त्यांच्याबाबत समजत गेल्या. पु ल नि व्यक्ती आणि वल्ली त्यावेळी प्रकाशित केलं होत त्यावेळी त्यातील चौकोनी कुटुंब ते यांचंच की काय असं मला वाटायचं. हल्ली लोक पुरोगामी असल्याचा अभिमान बाळगतात, देवासमोर हात जोडायला त्यांना कमीपणा वाटतो, सुधाकर रावांनी पण कधी देवावर पूर्ण विश्वास टाकला नाही. पण ते नास्तिक नव्हते. त्यांचं इंग्रजी अत्यंत अस्खलित होतं, ते नेहमी म्हणत, मराठी माणसाकडे इंग्रजी बोलायचा आत्मविश्वास नाही याचं एकमेव कारण म्हणजे आपण व्याकरणाच्या शुद्धतेकडे फार लक्ष देतो. आपण परफेक्शनिस्ट असतो." त्यांच्या पत्रकारितेविषयी बोलताना ते म्हणाले, " पत्रकारितेचा पायंडा आपल्याला लोकमान्य टिळकांनी घालून दिला.
माणसाला ओळखण्यासाठी माझा एक मापदंड आहे तो असा, ज्या व्यक्तींना शरद पवार विकत घेऊ शकतात ते एका बाजूला आणि त्यांना ते घेऊ शकत नाहीत ते दुसऱ्या बाजूला. सुधाकर राजे दुसऱ्या बाजूचे होते. आज तेवढे व्यासंगी पत्रकार क्वचित दिसतात, परंतु सुधाकर राजे हे खरंच अभ्यासू पत्रकार होते. त्यांच्या कुटुंबियांशी मी बोललो त्यांच्या उत्साहाबद्दल तर मला असे समजले की ते रोज संध्याकाळी एक ऍक्शन सिनेमा पाहत. हा त्यांचा ठरलेला दिनक्रम होता. " पवार
उत्तरप्रदेशचे भूतपूर्व राज्यपाल राम नाईक यांनी आपला त्यांच्याशी फार संबंध आला नाही म्हणून खेद व्यक्त केला, तेव्हा ते म्हणाले, " कांदिवली ते गोरेगाव असा दोन स्टेशनांचा प्रवास असूनही मला हवा तेवढा स्नेह त्यांचा मिळवता आला नाही. पण मला त्यांच्याविषयी नेहेमी ईर्षा वाटायची, मी काही लेखक नव्हतो, परंतु त्यांना जेवढे ज्ञान होते त्यावरून ते सहज चिमटा घेत, तोही सुखाचा चिमटा असे."
सुधाकर राजेंचे चिरंजीव ललित राजे आपल्या वडिलांच्या आठवणीत अत्यंत भावुक झाले होते, ते म्हणत, "मला आणि हेमांगीला अजूनही त्यांच्या अभ्यासिकेत ते असल्याचे पावित्र्य जाणवते. आज मला जो काही मन सन्मान मिळतो तो त्यांच्या कार्याने, फक्त त्यांच्या घराबाहेरील कर्तृत्वामुळे नाही तर माझ्या आयुष्यात पाणी मला जी मोलाची साथ दिली आणि नेहमी मार्गदर्शन केले त्याबद्दल मी स्वतःला नशीबवान समजतो. इंग्रजीची डिक्शनरी मला कधी वापरावी लागली नाही कारण बाबाना कोणत्या पानावर कोणता शब्द कुठे आहे हे पाठ असायचे. शेवटच्या काळात त्यांना ऐकू येत नव्हते, तेव्हा त्यांच्या बाजूला आम्ही वही पेन ठेवलं होतं. त्या वहीत लिहून आम्ही त्यांना सांगायचो. त्यानंतर ते फार शांत झाले. त्यांची एक उच्च होती, माझा उजवा हात जेव्हा काम पूर्ण बंद होईल आणि हातातलं पेन जेव्हा खाली पडेल तेव्हा माझा मृत्यू व्हावं. आणि तसेच झाले. वयाच्या ब्यायशीव्या वर्षीं त्यांनी एक पुस्तक लिहिले. तेव्हा ते म्हणत, माझे डोके दुखून लागले पण अभ्यास तर करायला हवा. त्यांनी आपले सर्वस्व वाहून घेतले होते या व्यवसायाला. ते त्यांनी अखेरच्या श्वासापर्यंत पूर्ण केले."
जेष्ठ पत्रकार प्रमोद बापट यांच्या आग्रहामुळे हा कार्यक्रम झाल्याचे सांगत ऍड विनय सहस्र्बुद्धे यांनी आपले मनोगत व्यक्त केले, ते म्हणाले," त्यांच्या आयुष्यच खर्च सोनं झालं. आपल्या संपूर्ण आयुष्यात त्यांनी अनेकांना ज्ञान दिले व त्यांच्या आयुष्याची अखेरची धनत्रयोदशीच्या दिवशी झाली. हा अत्यंत शुभ मुहूर्त होता. त्यांचं आयुष्य हे दुःख करण्यासारखं नव्हतंच. आजच्या काळात असे पत्रकार होत नाहीत, आणि म्हणूनच आपल्याकडे जे विद्यार्थी पत्रकार म्हणून शिक्षण घेतात त्यांना आपण पाट्यवृत्ती देतो. ती पाठ्यवृत्ती आता सुधाकर राजे यांच्या नावाने प्रदान करण्यात येईल." असे म्हणत सुधाकर राजेंना त्यांनी आपली श्रद्धांजली वाहिली.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार व लेखक मकरंद मुळ्ये यांनी केले. श्रद्धांजली सभेची सांगता शांती गीताने झाली. कार्यक्रमानंतर सर्वानी सुधाकर रावांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली.