आज जागर होता और कल महापौर होगा! : खा. पूनम महाजन

    07-Nov-2022
Total Views |



‘मातोश्री’च्या अंगणातून भाजपचे उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र!
आज जागर होता और कल महापौर होगा!

मुंबई : खा. पूनम महाजन यांनी आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. “मुंबईकर आणि मराठी माणसाचे नाव घेऊन उद्धवजींच्या शिवसेनेने राजकारण केले. आज वांद्रे पूर्व येथून ’जागर मुंबईचा’ अभियानाची पहिली सभा होत आहे. हा जागर कशासाठी तर मुंबईकरांना हक्काचे घर देण्यासाठी, संरक्षण खात्याच्या, रेल्वेच्या, विमानतळाच्या, सरकारी वसाहतीमध्ये, फनल झोनमध्ये अडकलेल्या, रखडलेल्या ‘एसआरए’ प्रकल्पामधील सर्व रहिवाशांना हक्काचे घर देण्यासाठी हा जागर होत आहे.

तुम्ही मराठी-गुजराती असा वाद निर्माण करताय? पण, तुम्हाला याचा विसर का पडलाय की, गुजरातचे भाजपचे अध्यक्ष मराठी आहेत. गुजरातमध्ये एका मराठी माणसाने हा झेंडा फडकवला, त्याचा तुम्हाला अभिमान नाही का? मुंबईतील हा जागर अनेक प्रश्न विचारणार आहेच, पण न सुटलेल्या मुंबईकरांच्या प्रश्नांचा जाब ही विचारणार आहे. आज मुंबईत भाजप जागर मुंबईचा करत असून येत्या काळात मुंबई महापालिकेत भाजपचा महापौर बसणार हे निश्चित आहे,” असा निर्धार पूनम महाजन यांनी यावेळी व्यक्त केला.

भाजपची साथ सोडून तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेचाही अपमान केला

खा.महाजन म्हणाल्या की, “या सभेकडे पाहून हे नक्की सांगता येईल की, हा फक्त ट्रेलर असून खरा सुपरहिट पिक्चर मुंबईत भाजपचा महापौर बसल्यावरच दिसणार आहे. 2019 मध्ये दोन मित्रांनी एकत्र लढाई लढली, पण असं काय झालं की मित्रांमध्ये फूट पडली? हा आमचा उद्धव ठाकरेंना सवाल आहे. भाजपची साथ सोडून तुम्ही केवळ भाजपसोबतच नाही तर महाराष्ट्राच्या जनमताचा देखील अपमान केला आहे.”

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.