लष्कराकडून ब्रम्होस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी !

    30-Nov-2022
Total Views |
 
ब्रम्होस
 
 
 
 
नवी दिल्ली : भारतीय लष्कराच्या पश्चिम कमांडने मंगळवारी सायंकाळी अंदमान - निकोबार येथून ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली.
 
भारतीय लष्कराच्या पश्चिम कमांडने मंगळवारी जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची चाचणी घेतली. लष्कराच्या अंदमान-निकोबार कमांडद्वारे अंदमान आणि निकोबार बेटांवरून ही चाचणी करण्यात आली. लेफ्टनंट जनरल अजय सिंह (अति विशिष्ट सेवा पदक प्राप्त) यांनी ब्रह्मोस क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीसाठी पश्चिन कमांडचे अभिनंदन केले आहे.
 
'ब्राह्मोस-२' या क्षेपणास्त्राच्या हायपरसॉनिक आवृत्तीच्या निर्मितीचे काम सुरु असून त्याची चाचणी २०२४ साली घेतली जाणार आहे. भारत आणि रशिया संयुक्तपणे 800 किमी पल्ल्याच्या ब्राह्मोस क्षेपणास्त्रांची नवीन पिढी विकसित करण्याची योजना आखत आहेत. अखेरीस सर्व क्षेपणास्त्रांचा पल्ला १५०० किलोमीटरच्या श्रेणीत अपग्रेड करण्याची योजना आहे.
 
चीन करणार १५०० अण्वस्त्रांचा साठा – पेंटागॉनचा अहवाल
 
चीनकडे २०३५ पर्यंत सुमारे १५०० अण्वस्त्रांचा साठा असण्याची अपेक्षा आहे, असे अमेरिकेच्या संरक्षण विभाग पेंटागॉनने म्हटले आहे. सध्या, चीनच्या अण्वस्त्रांची अंदाजे संख्या ४०० पेक्षा थोडी जास्त आहे. पुढील दशकात आपल्या अण्वस्त्रांचे आधुनिकीकरण, वैविध्य आणि विस्तार करण्याचे चीनचे उद्दिष्ट आहे, असे पेंटागॉनने चीनच्या महत्त्वाकांक्षी लष्करी योजनांबाबत काँग्रेसला दिलेल्या वार्षिक अहवालात म्हटले आहे.
 
 
  
अग्रलेख
जरुर वाचा
डिजिटल मीडिया पत्रकारांसाठी शासनाचा मोठा निर्णय; मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांच्याकडून सरकारच्या निर्णयाचे स्वागत

डिजिटल मीडिया पत्रकारांसाठी शासनाचा मोठा निर्णय; मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांच्याकडून सरकारच्या निर्णयाचे स्वागत

डिजिटल मीडियावर काम करणाऱ्या सर्वच डिजिटल पत्रकारांना शासन दरबारी हक्काच्या जाहिराती मिळाव्यात यासाठी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख,विश्वस्त किरण नाईक, विश्वस्त शरद पाबळे, राज्य अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर यांच्या मार्गदरणाखाली डिजिटल मीडिया परिषदेचे राज्य अध्यक्ष अनिल वाघमारे, राज्य कार्याध्यक्ष संतोष शिंदे व संपूर्ण डिजिटल मीडिया परिषद सातत्याने पाठपुरावा करत होती आज अखेर या संघटनात्मक पाठपुराव्याला यश आले असून राज्य सरकारने 3 जून 2025 रोजी एक शासन निर्णय जाहीर करून डिजिटल मीडियावरील ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121