उठांची बदलेली ‘स्टॅ्रटेजी’

    30-Nov-2022   
Total Views |
 
उद्धव ठाकरे
 
 
 
 
मागे आम्ही सत्तेेत होतो तेव्हा राज्यात कसे साधुची हत्या, सुशांत दिशा, मनसुख, पूजाचा मृत्यू, एकनाथ शिंदे 100 कोटींचे घोटाळे हे सगळे घडले होते. कोरोनामध्ये लोक तडपडून मरत होते. राज्याचे मंत्रीच तुरुंगात पण गेले. सगळीकडे कशी अंदाधुंदी होती. आता आम्ही सत्तेत नाही. एकनाथ आणि देवेंद्र सत्तेत आहेत. पण यांच्या राज्यात कोणी भ्रष्टाचार करताना दिसत नाही की कोणी नेता खून प्रकरणात अडकलेला दिसत नाही की कोणी बलात्कार प्रकरणात पण सापडत नाही. खोके बोके बोलून बघितले, तर सध्याच्या मुख्यमंत्री आणि त्यांच्यासोबतच्या लोकांकडे आमच्या कंटेनरचा हिशोब आहे म्हणे. त्यामुळे गप बसावे लागणार. तसेच, लोक आता आम्हाला महाराष्ट्र, मराठी अस्मिता नाही. आम्ही ठरवले की, आता ‘स्ट्रॅटेजी’बदलायची. सध्याच्या राज्य सरकारमधले कुणी काहीही म्हणाले तरी आता एकच म्हणायचे की या राज्यसरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला. मला कसेही सत्तेत यायचे आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन भाजप आणि शिंदे गटाला खोटे का होईना पण बदनाम करणे गरजेचे आहे. कोण आहे रे इकडे? कोण आहे रे तिकडे? सगळे एकनाथकडे गेले का? जाऊ दे गेले तर, तुरुंगातून आलेले आमचे प्रवक्ते आणि काकांसाहेबाकडून आलेल्या ताई आहेत ना. त्यांच्याकडून तालीम करून घेतली आहे. आता सगळीकडे हेच दिसेल की अमुक तमुक छत्रपतींबाबत असे म्हणाले, वावा असे केल्याने. मग आम्ही सत्तेत येऊ . काय म्हणता लोक आमचा डाव ओळखतात. थेट आसाममध्ये महाराष्ट्र सदन काढण्याची तयारी करणारे, औरंग्याच्या. अफजल खानाची कबर तोडून तिथे त्याच्या वधाची प्रात्यक्षिक चित्रफित लावणार्‍या भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या राज्यसरकारला, त्यांच्याशी संबधित प्रत्येक व्यक्तिला छत्रपती शिवाजी महाराजा दैवतच आहेत हे लोकांना माहिती आहे?हे पाहा अफजलची कबर मी पण तोडली असती. हं पण आमच्या काकासाहेबांनी आणि दिल्लीच्या मॅडमनी हिरवा झेंडा दाखवला नसता. काय म्हणता हे पण लोकांना माहिती आहे? आमचे नकली हिंदुत्व, आमचे बेगडी मराठी प्रेम सगळ सगळ माहिती आहे? आता काय करावे? थांबा काकासाहेबांना मॅडमना विचारतो.
 
 
ठार वेडेपण
 
 
राहुल गांधी सध्या हिंदू पद्धतीने पूजा अर्चा करून अगदी देवासमोर लोटांगणही घालताना दिसत आहेत. कपाळभर गंधकुंकू, अंगाभोवती ओम लिहिलेली शाल परिधान करून ते सध्या मध्यप्रदेशमध्ये दिसत आहेत. हे सगळे पाहून वाटते की, ‘मेरा देश बदल राहा है.’ माझ्या लहाणपणापासून ते आता 2012-13 सालापर्यंत मी एक वातावरण पाहिले आहे. मी हिंदू आहे आणि मी या देवाची पूजा करतो किंवा आमची संस्कृती चांगली आहे असे म्हणणारे या काळात क्वचितच भेटले. भाजप अपवाद वगळता नेतेमंडळी तर औषधालाही दिसले नव्हते. देशात पुरोगामित्व, निधर्मीपणाच्या आड बहुसंख्य हिंदू समाजाला एक प्रकारची दुय्यम वागणूक तर मिळत नाही ना, असे वाटू शकणार्‍या घटनाही त्याकाळी घडत होत्या. त्याचकाळात तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग जे कधीच बोलत नसत ते कधी नव्हे ते बोलले होते की देशातल्या संसाधनावर पहिला हक्क अल्पसंख्याकांचा आहे. का? हे घटनेत लिहिलेले आहे का? हे विचारण्याची चेतनाही तेव्हा समाजात दिसली नाही. अल्पसंख्य समाजाला रूचेल आवडेल आणि परवेडल असे बोलले की आपली मत पक्की अशा अविर्भावातच त्यावेळचे सत्ताधारी होते. या अशा पाश्वर्र्भूमीनंतर देशात गांधी परिवाराचे वंशज राहुल गांधी आपण कसे हिंदू आहोत? आपण कसे धार्मिक आहोत हे दाखवण्याचा अट्टाहास करत आहेत. हे तेच राहुल गांधी आहेत जे म्हणाले होते लोक मंदिरात मुलींना छेडायला जातात हे तेच राहुल गांधी आहेत. ज्यांनी भगवा दहशतवाद म्हणून हिंदू समाजाची निर्भत्सना केली होती. लोकानुनयासाठी राहुल गांधी सप्टेंबर महिन्यापासून यात्रा करत आहेत. पण केरळमध्ये जे राहुल होते तेच कर्नाटक आणि महाराष्ट्रात होते का? तेच मध्यप्रदेशात आहेत का? नाही त्यांची वेशभूषा बदलत गेली आहे. बदलणार्‍या वेशभुषे इतकेच तकलादू त्यांचे हिंदू प्रेम आहे हे भारतीयांना माहिती आहे. राहुल यांना का कळत नाही की संसदेमध्ये मोदींची गळाभेट घेतल्यानंतर कुटीलपणे सहकार्‍याला डोळा मारणारे राहुल गांधी कधीही निष्पाप असूच शकत नाहीत हे न कळायला लोक काय वेडे आहेत? पण ते म्हणतात ना माणूस जसा स्वतः असतो तसे लोकांना समजतो. त्यामुळेच राहुल लोकांना ठार वेडे समजत असावेत.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.