बीजिंग: चीनच्या ‘शून्य कोविड’ धोरणासाठी लावलेल्या निर्बंधामुळे अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम पडल्याचे चित्र आहे. याचा सर्वात जास्त परिणाम तरुणाईवर झाला आहे. 16 ते 24 वर्षे वयाची 18 टक्के तरुणाई बेरोजगार आहे. ग्रामीण भागातील तरुणाईकडे तीन महिन्यांपासून नोकरी नाही. आधी 26 लाख तरुणाईने सनदी सेवेसाठी अर्ज केले आहेत.
चीनमध्ये लाखो तरुणांना रोजगार देणार्या अनेक उद्योगाची स्थिती वाईट झाली आहे. मोठ्या इंटरनेट कंपन्यांवर मोठा दंड लावला आहे. कर्जातून सावरण्यासाठी बिल्डरांवर दडपशाही केली जात आहे. युवा उद्योगपती देश सोडत आहेत. ट्यूशन उद्योग बंद झाला आहे. परिणामी रोजगाराच्या संधी संपुष्टात आल्या आहेत. यामुळे अनेक तरुण/तरुणींना चांगल्या नोकरीसाठी अन्य देशांत जावे लागत आहे. अनेक ठिकाणी महिलांशी भेदभाव केला जात आहे.
तरुणाईला कारखान्यांत काम नको आहे. कारण, ‘लॉकडाऊन’ मध्ये कामगारांना कारखान्यांत कैद करून अनेक आठवडे काम करून घेतले. कैद्यांप्रमाणे वागणूक दिली. त्यामुळे तरुणाई आता कारखान्यांत जाण्यास धजावत नाहीत. बांधकाम क्षेत्रातील अनेक कंपन्यांत कुशल तंत्रज्ञ आणि तरुण मनुष्यबळाची टंचाई आहे. स्थलांतरित मजुरांचे सरासरी वय 42 झाले.