केजरीवालांच्या रॅलीवर सुरतमध्ये दगडफेक!

    28-Nov-2022
Total Views |
 Stones pelted at Kejariwala's rally
 
 
सुरत : गुजरातमधील सुरतमध्ये आम आदमी पार्टीचे (आप) अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांच्या रोड शोमध्ये हल्ला झाल्याचे वृत्त आहे. केजरीवाल यांच्या प्रचाराची रॅली शहरातील एक गल्ली पार करत असताना त्यांच्यावर अचानक दगडफेक झाली. या हल्यासाठी केजरीवाल यांनी भाजपला जबाबदार ठरवले आहे. परंतु निवडणुकीच्या तोंडावर केजरीवाल यांच्यावर हल्ले करून भाजप स्वतःची छबी खराब करण्यासारखा मूर्खपणा निश्चितच करणार नाही, असा दावा पक्षातील समर्थकांकडून करण्यात येत आहे.
 
 
या हल्यानंतर मध्यामांकडे प्रतिक्रिया नोंदवताना केजरीवाल म्हणाले कि, या लोकांनी (भाजप) गेल्या २७ वर्षात एकही काम केले नाही. राज्यात सर्वत्र महागाई, बेरोजगारी आहे. त्यांनी फक्त गुंडगिरी केली आहे. आत्ताच त्यांनी आमच्यावर दगडफेक केली. त्यांनी गेल्या २७ वर्षात काम केले असते तर आमच्यावर दगडफेक करावी लागली नसती.
 
 
दरम्यान आपल्या पक्षाची तरुणांमध्ये क्रेझ आहे. त्यामुळे पुढील महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पक्ष १८२ पैकी ९२ जागांवर विजय मिळवेल, असा दावा आपकडून करण्यात येतोय. तर केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाची लढाई भाजपशी नसून कॉंग्रेसशी आहे. या निवडणुकीत भाजपचेच पारडे जड असून कॉंग्रेसची स्पेस भरून काढण्यासाठी आपची धडपड सुरु असल्याचे मत राजकीय अभ्यासकांकडून वर्तवण्यात येत आहे.
 
 
१ डिसेंबरला २०२२ रोजी होणाऱ्या गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठीचा प्रचार, २९ नोव्हेंबर २०२२ ला संपेल. दुसऱ्या आणि अंतिम टप्प्यासाठी ५ डिसेंबरला मतदान होईल आणि ८ डिसेंबर २०२२ ला मतमोजणी होईल. सध्या निवडणुकीच्या तोंडवर गुजराचे राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे. त्यामुळे राज्यात दावे आणि प्रती दाव्यांना उत आलेला असल्याचे बोलले जाते.