केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपुरात उभारण्यात येत असलेल्या जगातील सर्वात मोठ्या फुटाळा कारंजे आणि वॉटर शो चा उद्घाटनपूर्व सोहळा गडकरी यांच्यासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी बघितला.
यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत, दत्तात्रय होसबळे, सहसरकार्यवाह कृष्ण गोपाल, मनमोहन वैद्य, अरुण कुमार, मुकुंदजी, रामदत्तजी, सुरेश सोनी आणि भाग्यय्या यांच्यासह वरिष्ठ प्रचारक आणि पदाधिकारी उपस्थित होते.
नागपुरातील फुटाळा तलाव येथील सर्वात उंच तरंगणाऱ्या म्युझिकल फाउंटनसह पाण्याच्या पडद्यावर अमिताभ बच्चन, गुलजार आणि नाना पाटेकर यांच्या आवाजात देशाच्या स्वातंत्र्याचा आणि नागपूरचा इतिहास प्रेक्षकांना ऐकायला मिळणार आहे.
'फुटाळा कारंजाची भव्यता आणि कल्पकता पाहण्यासाठी जगभरातून लोक येतील, मात्र त्यापूर्वी नागपुरातील प्रत्येकाने तो पहावा', असे आवाहन सरसंघचालक डॉ. मोहनजी यांनी आपल्या भाषणात केले.