तौहीरला ठोकल्या पोलिसांनी बेड्या; महिला डॉक्टरकडे टक लाऊन पाहणे,घाणेरडे इशारे..

    20-Nov-2022
Total Views |
Tauhir arrested police
 
 
लखनऊ ( Tauhir arrested police ): उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये एमबीबीएसची प्रॅक्टिस करणाऱ्या महिला डॉक्टरची आजारपणाच्या बहाण्याने छेड काढल्याची घटना समोर आली आहे. तौहीद अली नावाचा व्यक्ती जवळपास १ महिन्यापासून रूग्ण म्हणून रूग्णालयात येत असे. यावेळी तो महिला डॉक्टरांच्या अनुपस्थितीबाबत कर्मचाऱ्यांना विचारपूस करत होते. शनिवारी (१९ नोव्हेंबर २०२२) रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी तौहीद अलीला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी आरोपीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
पीडित मुलगी ( Tauhir arrested police ) जीएसव्हीएम मेडिकल कॉलेजची विद्यार्थिनी आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे प्रकरण स्वरूप नगर पोलिस स्टेशन हद्दीतील हलत हॉस्पिटलशी संबंधित आहे. येथे ओपीडीमध्ये एक महिला डॉक्टर तैनात होती. जी एमबीबीएसची विद्यार्थी आहे व रुग्णालयात प्रॅक्टिस करते. काही दिवसांपूर्वी तौहीद अली तेथे उपचारासाठी गेला होता, पुढे आजराचे कारण काढून तौहीर वारंवार हॉस्पिटलमध्ये जाऊ लागला.
मिळालेल्या माहितीनुसार, महिला डॉक्टर हॉस्पिटलमध्ये नसताना तो रुग्णालयातील इतर कर्मचाऱ्यांकडून ( Tauhir arrested police ) तिची माहिती घेत असे. विनाकारण ओपीडीमध्ये बसलेल्या डॉक्टरांना तो इशारा करत असे. तसेच तो दररोज वेगवेगळ्या आजारांसाठी प्रिस्क्रिप्शन बनवत असे, असाही आरोप आहे. यादरम्यान तो डॉक्टरांकडे टक लावून पाहत असे. तसेच तो ड्युटी संपल्यानंतर वसतिगृहात जाणाऱ्या डॉक्टरांच्या मागे लागला होता. सुरुवातीला डॉक्टरांनी तौहीदच्या कृत्याकडे दुर्लक्ष केले, पण नंतर तिने या कृतीबद्दल आपल्या सहकाऱ्यांना सांगितले.
शनिवारी वैद्यकीय विद्यार्थिनीच्या सहकाऱ्यांनी तौहीदला पकडून बेदम मारहाण केली. नंतर त्याला पोलिसांच्या ( Tauhir arrested police ) ताब्यात देण्यात आले. तौहीदने पोलिसांसमोर विद्यार्थिनीचा पाठलाग केल्याची कबुली दिली आहे. झडतीदरम्यान त्याच्याकडून वेगवेगळी पत्रकेही सापडली आहेत. ज्या दिवशी तौहीद पकडला गेला, त्याच दिवशी तो डोळ्याच्या आजाराचे निमित्त काढून हॉस्पिटल मध्ये गेला होता. हॉस्पिटलच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये तौहीदची मल्टिपल एंट्रीही दिसते.