फडणवीसांच्या भाषणातले एचएमव्ही पत्रकार कोण?

    02-Nov-2022
Total Views |


एचएमव्ही : वेदांता पाठोपाठ टाटा एअरबस प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याने ठाकरे गटाच्या शिवसेनेने आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी रेटून खोट बोलायला सुरुवात केलेली आहे. आता हे प्रकल्प कोणाच्या काळात राज्याबाहेर गेले हे जनतेच्या समोर येत असल्याने महाविकास आघाडी, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि युवराज आदित्य ठाकरेंची चांगलीच नाचक्की होताना दिसतीये.
 
 
काही दिवसांपूर्वी एका पत्रकाराने भर पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरे यांना महाविकास आघाडीच्या काळात राज्यात किती प्रकल्प आले व किती रोजगार उपलब्ध झाला याची आकडेवारी किंवा यादी द्याल का? असा सणसणीत प्रश्न विचारताच आदित्य ठाकरेंच्या चेहेऱ्यावरील भाव बदलेले. त्या पत्रकाराच्या प्रश्नाला हो देतो असे मोघम उत्तर देऊन पुढे यादी कधी द्याल असा प्रश्न येताच आदित्य यांनी त्याच्या प्रश्नाला बगल दिली. आदित्य ठाकरे यांना प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराचा खर तर सत्काराच करायला हवा. कारण सध्या महराष्ट्र विरुद्ध गुजरात महाराष्ट्र विरुद्ध तेलंगणा, महाराष्ट्र विरुद्ध केंद्र सरकार असा वाद निर्माण करून देशात दुफळी माजवण्याचे धंदे काही चाय बिस्कुट पत्रकारांनी ( एचएमव्ही पत्रकार )सुरु केले आहेत.
 
बरंं वेदांत किंवा टाटा एअर बस सारखे प्रकल्प महाराष्ट्रातून खरंच कोणाच्या काळात राज्या बाहेर गेले? का गेले? त्यातून कोणाला टक्केवारी हवी होती का? या प्रश्नांच्या खोलीत न शिरता केवळ मोदी, हिंदुत्व आणि फडणवीस द्वेषाने पछाडलेले काही पत्रकार राज्यातील जनतेची दिशाभूल व्हावी, ( एचएमव्ही पत्रकार ) अशा बातम्या प्रसारित करत आहेत. आता हे कोणाच्या सांगण्यावरून सुरु आहे. ते वेगळ सांगायला नको. ठराविक राजकीय नेत्यांकडून सुपारी घेऊन पत्रकारिता करणाऱ्यांसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एचएमव्ही असे नाव दिलय. आणि तिथेच न थांबता फडणवीसांनी त्याचा फुल फॉर्म सुद्धा सांगितलाय.
एचएमव्ही म्हणजे 'हिस मास्टर्स व्होईस' आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, हे एचएमव्ही ( एचएमव्ही पत्रकार ) म्हणजे नेमकं काय आहे? तर एचएमव्ही ही एक मोठी कंपनी होती. तिच्या लोगोवर संगीताच्या तबकडीसोबत एका कुत्र्याचे चित्र होते. एचएमव्हीच्या माध्यमातून या कुत्र्याच्या रुपकावरून उपमुख्यमंत्री बरेच काही बोलून गेले आहेत. खर तर फडणवीस म्हणजे अत्यंत शांत, संयमी आणि सर्वसमावेशक नेतृत्व त्यांच्यावर अनेकदा अत्यंत खालच्या पातळीवर टीका झालीये. २०१४ ते २०१९ या काळात राज्याचे मुख्यमंत्री असूनही त्यांनी कधीही आकस बाळगून कुठल्याही पत्रकाराला बेड्या ठोकल्या नाहीत, कि आपल्या पदाचा गैरवापर करून कोणाला जाणून बुजून त्रास दिला नाही.
 
फडणवीसांवर टीका केली किंवा मिम्स बनवले म्हणून भाजप कार्यकर्त्यांनी भरचौकात कोणालाही बेदम चोप दिला नाही. पण आमचे काही एचएमव्ही पत्रकार या सगळ्याकडे जाणून बुजून कानाडोळा करतात. एरव्ही अभिव्यक्तीच्या गप्पा मारणारे काही चाय बिस्कुट पत्रकार आपण लिहिलेले लेख मागे घेतात आणि माफी मागतात, का? तर ठराविक जमात आणि त्यांच्या दाढ्या कुरवाळणारे आपल्या मालकांची नाराजी ओढवली जाऊ नये म्हणून.
 
अगदी सचिन वाझे प्रकरणात अनेक चाय बिस्कुटांनी मुद्दम मुग गिळून गप्प राहणे पसंत केले. वाझेवर कोणाचा हात होता? कोणत्या राजकीय पक्षाशी त्याचे संबंध होते? त्याची नियुक्ती कधी व कोणी केली हे सगळ उघड असताना, राज्यातल्या एचएमव्ही पत्रकारांनी ( एचएमव्ही पत्रकार ) वाझे खंडणी प्रकरणासाठी महाविकास आघाडी व तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून प्रश्न विचारले नाहीत. देशातील एका मोठ्या उद्योजकाच्या घराखाली स्फोटके सापडतात. ते सुद्धा मुंबई सारख्या देशाच्या आर्थिक राजधानीत आणि आंतरराष्टीय ख्यातीच्या एका मोठ्या शहरात त्यामुळे हा देश स्वतःच्या देशातील उद्योगपतींची सुरक्षा करू शकत नाही, असा जगभरात संदेश जातो. तर महाराष्ट्रात उदयोग करणे सुरक्षित नाहीत, असा देशभरात मेसेज जातो.
 
त्यामुळेच वेदांता, टाटा एअर बस आणि सॅफ्रॉन सारखे प्रकल्प महाविकास आघाडीच्या अंदाधुंद कारभारामुळे राज्या बाहेर गेलेत का? असा प्रश्न उपस्थित होतो. कारण गुजरात सरकारने टाटा एअरबसचे डील सप्टेंबर २०२१ मध्येच केले होते. तसेच सॅफ्रन विमानाची इंजिने बनवणारा सॅफ्रन ग्रुप महाराष्ट्रातून गेला, अशी बोंब ठोकणारे एचएमव्ही पत्रकार हैदराबादमध्ये या कंपनीने उत्पादनही सुरू केले आहे, हे सत्य जाणून बुजून लपवत आहेत. आणि म्हणूनच एचएमव्ही कंपनीच्या लोगोवर असणारे चित्र अश्या ( एचएमव्ही पत्रकार ) पत्रकारांना अगदी समर्पक आहे. भविष्यकाळात 'हिस मास्टर्स व्होईस' अर्थात एचएमव्ही पत्रकार स्वतःच्या कुकर्मांनी एक्सपोज होतीलच फडणवीसांनी आपल्या पत्रकार परीशादेतुन त्याचा शंख फुंकलाय इतक मात्र नक्की..
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.