ब्रिटनमध्ये मंदी जाहीर! ऋशी सुनक सरकारची घोषणा

    18-Nov-2022
Total Views |

ऋशी सुनक
 
 
 
ब्रिटन : गेल्या काही दिवसांपासून ब्रिटन अत्यंत वाईट परिस्थितीत आहे. येत्या काही दिवसांत तिची अर्थव्यवस्था आणखी कमकुवत होण्यापूर्वी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या सरकारने मंदीवर मात करण्यासाठी काही महत्त्वाची पाऊलं उचलण्याची घोषणा केली आहे. ऋषी सुनक पंतप्रधानांच्या शर्यतीत होते, तेव्हापासूनच लोकांनी त्यांच्याकडून अपेक्षा ठेवायला सुरुवात केली होती. महागाईच्या समस्येपासून सुटण्याकरता ऋषी सुनक काहीतरी उपाययोजना आखतील अशी आशा होती. सुनक यांच्या सरकारने 5500 कोटी पौंडची आर्थिक योजना सादर केली आहे. आदल्या दिवशी अर्थमंत्री जेरेमी हंट यांनी सरकारचा आणीबाणीचा अर्थसंकल्प उघड केला, ज्यामध्ये कर दरांमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे.
 
 
ब्रिटन सरकारने बजेटसह स्वतंत्र ओबीआर (ऑफिस फॉर बजेट रिस्पॉनसिबलिटी) चा एक अहवालही सादर करण्यात आला आहे. रशिया-युक्रेनमधील युद्धामुळे ऊर्जांच्या किमतीत वाढ होत आहे. यामुळे ब्रिटनची अर्थव्यवस्था तोट्यात गेली आहे. २०२४ पर्यंत मंदी ओसरण्याची शक्यता कमी असल्याचंही या अहवालात म्हटलं आहे.
 
 
जेरेमी हंट यांनी सांगितलं की, संपूर्ण जग महागाईच्या आगीत होरपळत आहे. स्थिरता, विकास आणि सार्वजनिक सेवासह आपण मंदीविरोधात सामना करत आहोत. ब्रिटनमध्ये महागाईच्या दराने ४१ वर्षांचा रेकॉर्ड तोडला आहे. ऑक्टोबर महिन्यात महागाई दर ११.१ टक्के होता. १९८१ नंतरचा हा सर्वांत मोठा महागाई दर आहे.