राहुल गांधींच्या वक्तव्याचा साधा निषेधही नाही! पण राऊत म्हणतात... "सावरकरांना…"

    17-Nov-2022
Total Views |


मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न देण्यात यावा, असे मत शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केले. वीर सावरकर हे हिंदुत्वाचे कट्टर समर्थक होते, त्यांच्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी वीर सावरकरांचे विचार देशातील जनतेपर्यंत पोहोचवले. त्यामुळेच या दोन नेत्यांना भारतरत्न पुरस्कार देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घ्यावा. या पदव्या दिल्यामुळे सावरकर किंवा बाळासाहेब मोठे होणार नाहीत, तर पदव्या मोठ्या होतील. असे राऊत म्हणाले.

राऊतांच्या या विधानावरून एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे, राहुल गांधींनी सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्याचा साधा निषेधही नाही करता न येणाऱ्यांनी "स्वातंत्र्यसैनिक वीर सावरकर आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न देण्यात यावा." असे विधान केले. सत्ताधारी फडणवीस-शिंदे सरकारने राहुल गांधींचा समाचार तर घेतलाच. पण, याबाबत उद्धव ठाकरे यांना विचारले असता ते म्हणाले, "मी अगदी स्पष्टपणे आणि ठामपणे सांगतोय की, स्वातंत्र्यसेनानी सावरकरांबद्दल आपले नितांत प्रेम, नितांत आदर आणि श्रद्धा आहे. कुणी काहीही म्हटलं तरी ते मिटवता येत नाही. ज्याचा स्वातंत्र्य चळवळीशी खोलवर संबंध आहे. त्यांना स्वातंत्र्य सैनिकांबद्दल बोलण्याचा अधिकार नाही. आधी सांगा की भारतरत्न देण्याचा अधिकार संपूर्णपणे पंतप्रधानांकडे आहे. आठ वर्षांत स्वातंत्र्यसैनिकांना भारतरत्न का नाही दिला?" असा सवाल केला.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.