आव्हाडांची स्टाईल म्हणजे... ; फडणवीसांनी लगावला टोला!

    14-Nov-2022
Total Views |


हेही वाचा : 

अग्निकांडात उध्वस्त झालेल्या कुटुंबाला फडणवीसांची मदत!
मुंबई: वरळीच्या शांतीनगर भागातील रहिवासी असलेल्या कुटुंबावर काही दिवसांपूर्वी झालेल्या अग्निकांडामुळे मोठे संकट कोसळले होते. दैनंदिन वापरासाठीच्या घरातील सर्व वस्तू आणि दुकानातील साहित्य देखील या आगीत भस्मसात झाले होते. अडचणीत आलेल्या या कुटुंबाच्या मदतीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धावून आले असून अवघ्या एका मेलवर फडणवीसांनी कुटुंबाला थेट मदत पोहोचवली आहे. फडणवीसांच्या दातृत्वाचा वरळीकरांना आलेला हा सलग दुसरा अनुभव असून या मदतीसाठी पिडीतांनी त्यांचे आभार मानले आहेत.
शांतीनगरच्या सातरस्ता परिसरात राहणाऱ्या लाड कुटुंबियांच्या घराला सोमवार, दि. ७ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी साडे सातच्या सुमारास आग लागली. प्राथमिक माहितीनुसार ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे निष्पन्न झाले होते. भाड्याने राहणाऱ्या आणि एका दुकानाच्या आधारावर अर्थार्जन करून आपली गुजराण करणाऱ्या लाड कुटुंबियांचे याला आगीत मोठे नुकसान झाले होते. लाड कुटुंबीयांनी सदर घटनेची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवत मदतीसाठी साकडे घातले होते. यावर तात्काळ प्रतिसाद देत स्थानिक पदाधिकाऱ्यांशी समन्वय साधून ही मदत पोहोचवली आहे.
संकटात साथ दिली ती फडणवीसांनीच

नेत्यांकडे मदतीची मागणी करणाऱ्याचे अनेक प्रसंग दैनंदिन आयुष्यात अनुभवायला येतात, मात्र त्याची तात्काळ दखल घेत मदत प्रत्यक्ष व्यक्तींपर्यंत पोहोचवण्याचे काम मात्र फडणवीसांनीच करून दाखवले आहे, अशी भावना लाड कुटुंबीयांनी व्यक्त केली. अग्निकांडाची घटना घडल्यानंतर आम्ही फडणवीस यांना एक मेलकरून याबाबत कल्पना दिली होती. त्यावर अवघ्या चोवीस तासांच्या आत आम्हाला थेट मदत पोहोचवण्याचे काम त्यांनी करून दिली आहे. आरती पुगांवकर यांचे देखील आम्हाला सहकार्य लाभले आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने आम्हाला संकटात साथ दिली ती फडणवीसांनीच, असे म्हणत लाड कुटुंबीयांनी फडणवीसांचे आभार मानले आहेत.
देवेंद्र फडणवीस यांच्या मार्फत लाड कुटुंबियांसाठी पाठवण्यात आलेला २५ हजारांचा धनादेश शनिवार, दि. १२ नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता लाड कुटुंबियांना भाजप पदाधिकाऱ्यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी भाजपचे दक्षिण मुंबई जिल्हा सरचिटणीस दीपक सावंत, प्रवक्त्या आरती पुगांवकर यांच्यासह सुधीर राऊत, महामंत्री सुरेश दिवाकर, राजू खोपकर, माजी वॉर्ड अध्यक्ष दर्शन पुगावकर यावेळी उपस्थित होते.

फडणवीसांच्या संवेदनशीलतेचा दुसरा अनुभव
अडचणीत सापडलेल्या व्यक्तीला केवळ एका ई मेलवर मदत पोहोचवण्याची फडणवीसांची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी वरळीच्या अनिबेझंट मार्गावरील पंचशील ३ इमारतीत राहणाऱ्या गायकवाड कुटुंबाचे घर गुरुवार, दि. २० ऑक्टोबर रोजी लागलेल्या आगीत जळून खाक झाले होते.काही दिवसांवर आलेली दिवाळी आणि डोक्यावरून हरवलेलं छप्पर यामुळे दुःखाचा डोंगर कोसळलेल्या कुटुंबाने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदतीची याचना केली. त्यावर तात्काळ प्रतिसाद देत फडणवीस यांनी मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्याशी समन्वय साधून त्या कुटुंबाला मदत पोहोच करण्याची तजवीज केली. फडणवीसांनी दिलेल्या आदेशानंतर लोढांनी सूत्रे हलवली आणि दक्षिण मुंबई भाजपच्या माध्यमातून त्या कुटुंबाला थेट मदत पोहोच करण्याचे कार्य करून दाखवले होते. त्यामुळे फडणवीसांच्या संवेदनशीलतेचा दुसरा अनुभव वरळीकर आणि मुंबईकरांना आला आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.