‘स्नेक्स इन दी गंगा : ब्रेकिंग इंडिया 2.0’ या पुस्तकातून उघड झालेले भारतविरोधी धक्कादायक वास्तव (भाग-2)

    12-Nov-2022   
Total Views |
 
‘स्नेक्स इन दी गंगा : ब्रेकिंग इंडिया 2.0’
 
 
 
 
2011 साली लिहिलेल्या राजीव मल्होत्रा यांचे पूर्वीचे क्लासिक पुस्तक, ‘ब्रेकिंग इंडिया 1.0’मध्ये चर्चा केलेल्या विषयांच्या तुलनेत नवीन पुस्तक ‘ब्रेकिंग इंडिया 2.0’मधले धोके नवीन आहेत. त्याविषयी आजच्या दुसर्‍या भागात सविस्तर जाणून घेऊया.
 
 
‘ब्रेकिंग इंडिया 1.0’मध्ये भाकित केलेल्या धोक्यांचा थोडक्यात सारांश
 
 
2011 साली लिहिलेल्या राजीव मल्होत्रा यांचे पूर्वीचे क्लासिक पुस्तक, ‘ब्रेकिंग इंडिया 1.0’मध्ये चर्चा केलेल्या विषयांच्या तुलनेत नवीन पुस्तक ‘ब्रेकिंग इंडिया 2.0’मधले धोके नवीन आहेत, असे ‘ब्रेकिंग इंडिया 2.0’ची बाय-लाईन स्पष्ट करते. यावेळेस भारतविरोधी शक्ती अधिक व्यापक पाठिंबा भारतात आणि अमेरिकेत मिळवताना दिसतात. 2011 मध्ये भाकित केलेल्या धोक्यांचा थोडक्यात सारांश पुढील परिच्छेदात दिला आहे.
 
 
या पुस्तकात नमूद केल्यानुसार, त्यावेळेस अ‍ॅफ्रो-दलित प्रकल्पाचा दलितांना भारतातील ‘काळे’ आणि दलितेतरांना भारताचे ‘गोरे’ म्हणून रंगवण्याचा हेतू होता. अमेरिकन वंशवाद, गुलामगिरी आणि कृष्णवर्णीय संबंधांचा इतिहास, काळ्यांना दिलेली गैर वागणूक भारतीय समाजावर लादली जात होती, जे पूर्णपणे चुकीचे होते.
 
 
निधीचा गैरवापर धर्म प्रसार आणि काहींची विचारसरणी बदलण्याकरिता
 
 
लेखक अमेरिकन चर्चच्या भारतात वाटप केलेल्या निधीवर संशोधन करत होते. जसे की गरीब मुलांना खायला अन्न देणे, कपडे आणि त्यांना शिक्षण देऊन ‘जतन’ करण्यासाठी लोकप्रिय जाहिरात मोहीम राबवल्या जात होत्या. तथापि, भारताच्या दौर्‍यांदरम्यान, त्यांना असे आढळून आले की गोळा केलेला निधी प्रायोजकांनी सूचित केलेल्या उद्देशांसाठी वापरला जात नाही. काहींची विचारसरणी बदलण्याकरिता की, भारतामध्ये आमच्यावरती अन्याय होत आहे, ज्याचे भारतीय समाज किंवा भारताचे सरकार निवारण करू शकणार नाही, त्याकरिता आम्हाला हा लढा अमेरिकेत जाऊन आणि अमेरिकेच्या विद्वानांच्या समोर मांडून लढावा लागेल, याकरिता हा सगळा निधी वापरला गेला.असे काही तथाकथित विद्वान आज अमेरिकेमध्ये या विषयावर चुकीची माहिती पसरण्याचा मोठा प्रयत्न करतात आणि त्यांना अमेरिकेत माध्यमांमध्ये, अमेरिकन विद्यापीठांमध्ये, अमेरिकन विचारमंचांमध्ये प्रसिद्धी दिली जाते.
 
 
याव्यतिरिक्त काही विचारसरणी बदललेल्यांना अमेरिकेतील थिंक टँक, विद्वान, मानवाधिकार गट आणि शिक्षणतज्ज्ञांसह असंख्य वादविवादांमध्ये सामील होण्याकरिता निमंत्रित केले जाते. पुष्कळ पैसे धर्म परिवर्तनासाठी वापरले गेले व अजूनसुद्धा लपूनछपून ते तसे वापरले जात आहेत.
 
 
खलिस्तानी, काश्मिरी अतिरेकी, माओवादी इतर विध्वंसक घटकांना बौद्धिक पाठिंबा
 
 
‘ब्रेकिंग इंडिया 1.0’ पुस्तकाने आपल्या राष्ट्रीय अखंडतेबद्दल चिंतित असलेल्या प्रत्येक भारतीयासाठी धोक्याची घंटा वाजवायला हवी होती. भारत हे एका मोठ्या एंटरप्राइझचे, कार्य स्थानाचे मुख्य लक्ष्य आहे - संस्था, व्यक्ती आणि चर्च यांचे एक ’नेटवर्क’ - जे भारतातील असुरक्षित वर्गांसाठी एक ओळख, इतिहास आणि धर्म निर्माण करण्याच्या कार्यासाठी समर्पित दिसते.
या कार्यस्थानात केवळ चर्च, सरकारी संस्था,नाहीत तर खासगी ‘थिंक टँक’ आणि शैक्षणिक संस्थादेखील समाविष्ट आहेत. पृष्ठभागावर ते एकमेकांपासून वेगळे आणि अलिप्त असल्याचे दिसून येते. परंतु, प्रत्यक्षात असे आढळून आले की, त्यांच्या कारवाया उत्तम प्रकारे समन्वयित केल्या जात आहेत आणि अमेरिका आणि युरोपकडून त्यांना 50 हजार ते 60 हजार कोटींचा निधी दिला जात होता. हे गट खलिस्तानी, काश्मीर अतिरेक्यांना माओवादी आणि भारतातील इतर विध्वंसक घटकांना बौद्धिक पाठिंबा देत होते आणि त्यांना अमेरिकेत यायचे आमंत्रण देत होते व प्रसिद्ध करत होते.
 
 
2014 नंतर या धोक्यांच्या विरुद्ध कारवायांचे सत्र
 
 
‘ब्रेकिंग इंडिया 1.0’ पुस्तकातील निष्कर्षांची भारतीयांनी गांभीर्याने दखल घेतली नाही. मात्र, 2014 नंतर या धोक्यांच्या विरुद्ध अनेक कारवाया करण्यात आल्या. त्यामुळे ‘ब्रेकिंग इंडिया 2.0’च्या समर्थकांना भारताला तोडण्याकरिता भारतात आता मोकळे रान मिळत नाही. त्यांच्याविरुद्ध सरकारी पातळीवर अनेक कारवाया केल्या गेल्या. उदाहरणार्थ, ‘एफसीआरए’ या कायद्याचा वापर करून देशद्रोही संस्थांकडे येणारे 50 ते 60 हजार कोटी रुपये आता थांबवण्यात आले आहेत. हजारो संस्था देशद्रोही कारवाया करत होत्या, त्यांच्यावर ती बंदी घालण्यात आलेली आहे. पण, यामुळे सर्व धोके थांबतील असे नाही. कारण, पैसा अजून सुद्धा हवालाच्या पद्धतीने देशामध्ये येतो आणि बंदी घातलेल्या संस्थांना नवीन नाव घेऊन पुन्हा पुढे येण्याचा प्रयत्न करत आहे. ‘ब्रेकिंग इंडिया 2.0’ पुस्तकातील निष्कर्षांचा सारांश खालील काही परिच्छेदांमध्ये उघड करण्याचा प्रयत्न या लेखात केला आहे.
 
  
मार्क्सवाद हा ‘क्रिटिकल रेस थिअरी’ म्हणून पुनर्जन्मित
 
 
‘ब्रेकिंग इंडिया’ घटकांनी एक सिद्धांत निर्माण करून ‘क्रिटिकल रेस थिअरी’ प्रस्थापित केली. त्यात ‘अमेरिकेतील शिक्षणसंस्था आणि लोक हे भारताहून श्रेष्ठ आहेत,’ असे समजले जाते. त्यांचा असा समज आहे की, भारतात अल्पसंख्याक सुरक्षित नाहीत, येथे जातीयवाद अधिक आहे, महिलांवर अत्याचार होतात, सत्ताधारी पक्ष अत्याचार करत असतात. या सर्व समस्यांतून भारताला वाचवण्यासाठी त्याचे तुकडे केले पाहिजेत. त्यामुळे भारतातील लोकांवरील आक्रमणे थांबतील आणि तो एक चांगला देश म्हणून समोर येईल.
 
 
मार्क्सवाद हा अमेरिकन विचारवंतांमध्ये ‘क्रिटिकल रेस थिअरी’ म्हणून पुनर्जन्मित झाला आहे आणि अमेरिकेच्या वर्णद्वेषाला संबोधित करण्यासाठी ‘फ्रेमवर्क’ म्हणून त्याचा वापर केला जातो. हे अविचारीपणे भारतावरही लादले जात आहे. जात ही वंशाशी समतूल्य आहे. भारतातील उपेक्षित समुदायांना ‘काळे’ आणि ब्राह्मणांना भारतातील ‘गोरे’ मानले जाते. तक्रारींचा दावा करणारे गट (जसे की मुस्लीम आणि ङॠइढट+) कृत्रिमरित्या एकत्र केले जात आहे.
 
 
‘वोक थिअरी’/‘वोकिझम’ - म्हणजे भारतीयांना अमेरिकन सिद्धांताप्रमाणे जागृत करणे
 
 
त्यांचा एक सिद्धांत (थिअरी) आहे, त्याला ‘वोक थिअरी’ म्हटले जाते. भारतीयांना अमेरिकन सिद्धांताप्रमाणे जागृत केले पाहिजे. तेथील काही विद्यापीठांमध्ये भारताला वाचवण्यासाठी त्याचे विभाजन कसे करायचे, अशा प्रकारचे संशोधन केले जाते. त्याला ‘वोकिझम’ असेही म्हटले जाते. त्यांना वाटते की, ‘हॉवर्ड विद्यापीठ’ हे विश्वगुरू आहे आणि तेच भारताला वाचवू शकते.
अमेरिकेतील संस्था काही भारतीयांच्या मदतीने मानवी हक्क, महिला अत्याचाराच्या विरोधात आणि पर्यावरण रक्षणाच्या नावाखाली भारतात हिंसक आंदोलने करून अराजकता माजवत होते किंवा विकासामध्ये बाधा आणत होते. या संस्था भारतात दुर्बलांवर अत्याचार होत असल्याचे चित्र निर्माण करत होते. ‘वोक चळवळ’/‘वोकीझम’ म्हणून ओळखले जाणारे, भारताचे सरकार, शैक्षणिक संस्था, संस्कृती, उद्योग आणि समाज यांच्याविरुद्ध बिनधास्त युद्ध पुकारून भारतीय सभ्यता आणि वारसा नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे.
 
 
अमेरिकेत ‘गन पॉलिसी’ (बंदुकीविषयीचे धोरण) मुळे अमेरिकी स्वतःच्याच मुलांना ठार करतात, याविषयी ते काही बोलायला तयार नाहीत. अमेरिकन समाजामध्ये अनेक त्रुटी आहेत. त्याविषयी बोलले जात नाही, मात्र यांचे सगळे लक्ष भारतावर. म्हणूनच ‘ब्रेकिंग इंडिया 2.0’ भारताच्या असुरक्षिततेबद्दल अस्वस्थ सत्य उघड करते. भारताच्या अखंडतेविरुद्ध हे तीव्र युद्ध एका नवीन विचारसरणीने चालवलेल्या सुव्यवस्थित जागतिक यंत्रणेचे काम आहे.
 
 
आता धोके अनेक पटींनी वाढले आहेत. ‘स्नेक्स इन दी गंगा : ब्रेकिंग इंडिया 2.0’ या पुस्तकातून भारताने धोके समजून घेऊन ते दूर केले पाहिजेत, चीन त्याचाच लाभ उठवत आहे. अशा देशद्रोही कारवाया थांबवण्याची लढाई अनेक वर्षे चालू ठेवावीच लागेल, तरच देशाला आपण भावी पिढ्यांसाठी सुरक्षित ठेवू शकू.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

हेमंत महाजन

लेखक निवृत्त ब्रिग्रेडियर असून भारतीय सैन्य दल, राष्ट्रीय सुरक्षा तसेच भारताचे परराष्ट्रीय संबंध या विषयांवर त्यांचा खास अभ्यास आहे. ‘आव्हान चिनी ड्रॅगनचे’, ‘नक्षलवादाचे आव्हान-चीनचे भारताशी छुपे युद्ध’ ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत.