नवी दिल्ली : दिल्ली मद्य घोटाळ्यामध्ये दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी १०० कोटी रुपयांची लाच घेतली आहे, असा आरोप भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबीत पात्रा यांनी शुक्रवारी पत्रकारपरिषदेत केला आहे.
दिल्ली मद्य घोटाळ्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे विश्वासू मनी। सिसोदिया हे आरी क्रमांक १ आहेत. भाजप त्यांच्याविरोधात सातत्याने नवनवे खुलासे करत आहे, त्यानुसार शुक्रवारी झालेल्या पत्रकारपरिषदेत भाजप प्रवक्ते संबीत पात्रा यांनी सिसोदिया यांच्यावर १०० कोटींच्या लाचखोरीचा आरोप केला.
ते म्हणाले, दारू धोरण घोटाळ्याचे सत्य दररोज बाहेर येत आहे. या घोटाळ्यामुळे दिल्ली सरकारच्या महसुलाचे 2631 कोटींचे नुकसान झाले आहे. मनीष सिसोदिया यांनी डिजिटल पुरावे नष्ट करण्यासाठी तब्बल १४० मोबाईल फोन संच केले आहेत. त्यासाठी १ कोटी २० लाख रुपये खर्च करण्यात आले. दिल्ली सरकार आणि मनीष सिसोदिया यांच्या सदस्यांनी या दोन उद्योगपती आणि त्यांच्या कंपन्यांकडून १०० कोटी रुपयांची आगाऊ रक्कम घेतली होती, असेही पात्रा यांनी म्हटले आहे.