उद्धव ठाकरेंची जगन मोहन रेड्डींशी तुलना योग्य की अयोग्य?

उगाच जगन मोहन रेड्डींची तुलना उद्धव ठाकरेंशी करू नका! माजी खासदार निलेश राणेंनी सुनावलं!

    09-Oct-2022
Total Views |
Uddhav VS Jagan Mohan Reddy




रत्नागिरी :
"उगाच आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांची तुलना उद्धव ठाकरे बरोबर करू नका. त्यांचे वडील काँग्रेसमध्ये होते तिथून ते वेगळे झाले आणि स्वतःचा पक्ष उभा करून ते मुख्यमंत्री झाले. उद्धव ठाकरेला बापाचा पक्ष आयता मिळाला आणि तोच पक्ष संपवणारा उद्धव ठाकरे एकच.", अशा शेलक्या शब्दांत माजी खासदार निलेश राणे यांनी माजी मुख्यमंत्री ठाकरे गटप्रमुख उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना पक्ष ही नावे केंद्रीय निवडणूक आयोगाने अंधेरी पोटनिवडणूकी पुरती गोठविल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रीया दिली आहे.



निलेश राणे म्हणाले, "नियतीने उद्धव ठाकरे चे बारा वाजवले, फुकट मिळालेल्या गोष्टींवर किती उडायचं याला पण मर्यादा आहेत. उद्धव ठाकरे ने आयुष्य फुकट बसून खाल्लं, त्याला वाटलं सगळं असंच राहणार पण हे कर्म आहेत उद्धव ठाकरे तुला याच जन्मात फेडावे लागणार आणि ही सुरुवात आहे अजून भरपूर तुला भोगावे लागणार." अशा शब्दांत त्यांनी या प्रकरणाचा समाचार घेतला आहे. "बाप गेला, पक्ष गेला चिन्हही गेलं! पण जगन मोहन रेड्डी निवडून आले मुख्यमंत्रीही झाले! ", अशा आशयाच्या पोस्ट सोशल मीडियावर पोस्ट केल्या जात आहेत. यानिमित्ताने उद्धव ठाकरेंची तुलना जगन मोहन रेड्डी यांच्याशी केली जात आहे. यावर ही राणेंनी प्रतिक्रीया दिली आहे.




news






बाप गेला पक्ष गेला पण जगन मोहन रेड्डींच्या संघर्षाने पुन्हा पक्ष उभा राहिला!


"महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या कधी नव्हे इतकी ऐतिहासिक उलथापालथ होत आहे. शिवसेनेकडे धनुष्यबाण हे चिन्ह देखील राहील की नाही अशी नामुष्की एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे उडवली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत ४० आमदारांसह तब्बल १२ खासदार आहेत. तर उद्धव ठाकरेंकडे आयात केलेली मंडळी मोजून त्यांना दोन अंकी संख्याही गाठता आलेली नाही. महाराष्ट्रात ही अभूतपूर्व स्थिती असताना उद्धव ठाकरे यांच्याकडे बाळासाहेब ठाकरे यांची पुण्याई सोडली तर पक्षासाठी काहीही शिल्लक राहिले नसल्याचे दिसून येते.
पण दक्षिणेच्या राजकारणात फिनिक्स पक्षाप्रमाणे पुन्हा एकदा राखेतून भरारी घेणाऱ्या एका व्यक्तिमत्त्वाने जगाला दाखवून दिलं होतं की महत्त्वकांक्षा इच्छाशक्ती आणि ध्येयनिश्चितीच्या जोरावर एखादा व्यक्ती राजकारणात काय करू शकतो ही गोष्ट आहे तेलंगणाचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांची वडील वाय एस राजशेखर रेड्डी यांच्या निधनानंतर जगन मोहन रेड्डी यांना कमाई पेक्षा अधिक संपत्ती च्या प्रकरणात तुरुंगात जावे लागले होते वडील गेल्यानंतर दिल्ली काँग्रेसने त्यांच्या राजकीय अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण केले होते.


news YSR congress



हायकमांडचा रोष त्यांच्यावर होता पण आयुष्यात किती तारखेला आले तरी व्यक्ती हा अजून जात नाही याचं याचा एक उदाहरण म्हणजे जगन मोहन रेड्डी आहेत एक छोटा व्यापारी ते वीस वर्षात एक यशस्वी राजकारण म्हणून रेड्डी यांना ओळखले जाते वडिलांच्या निधनानंतर एका पक्ष स्थापन करत त्यांनी वाय एस आर काँग्रेस या पक्षाचा मुख्यमंत्री बसवून दाखवला राजकारणातील पहिली दहा वर्ष खूप यशस्वी आणि कमी चढउतारांची होती मात्र दुसऱ्या दहा वर्षात त्यांना मोठ्या संकटांचा सामना करावा लागला होता.




YSR


तरीही या संकटांवर मात करत मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीपर्यंत रेड्डी पोहोचले १९९९ मध्ये कर्नाटकच्या संदूर येथून एक पावर कंपनी सुरू करत आपल्या कारकीर्दीचा श्री गणेशा त्यांनी केला होता कंपनीचा विस्तार पूर्वोत्तर भारतात झपाट्याने झाला त्यांचे वडील राजशेखर रेड्डी जेव्हा मुख्यमंत्री बनले त्यावेळी त्यांच्या व्यवसाय वृद्धीला डबल इंजिनाची साथ मिळाली यातून मीडिया पावर यासह अनेक उद्योगात रेड्डीने नशीब आजमावून पाहिले त्यांच्या राजकीय महत्त्वकांक्षा यापूर्वीही आपल्या नाही आणि आजही लपत नाही.
२००४ मध्ये खासदारकीची निवडणूक लढावी म्हणून त्यांनी काँग्रेस हायकमांडकडे मागणी केली होती. 


 मात्र पक्षाने त्यांच्या या मागणीला केराची टोपली दाखवली होती त्यासाठी २००९ पर्यंत रेड्डी यांना वाट पाहावी लागली राजकारणात आपला डाव हा सावज पाहूनच खायचा असतो अशी म्हण आहे रेडी यांनी नेमकं तेच केलं त्यांनी खासदारकी जिंकली पण वडिलांचं हेलिकॉप्टर अपघातात अकाली निधन झाल्यानंतर रेड्डींवर दुःखाचा डोंगरच कोसळला होता सोनिया गांधी यांच्या काँग्रेसने या काळात पक्ष म्हणून खंबीरपणे पाठीशी उभे राहण्याचे सोडून रेडी यांच्या खच्चीकरणाची तयारीच केली होती.
मुख्यमंत्री होण्यासाठी त्यांनी दिल्ली हायकमांडकडे विनंती केली होती. मात्र, त्याचा काहीच उपयोग झाला नाही वडिलांची अंत्ययात्रा काढण्यासाठी ही तत्कालीन प्रशासनकर्त्यांनी यांनी त्यांना परवानगी दिली नाही आंध्रप्रदेशमध्ये १७७ जागांची विधानसभा आहे त्यापैकी १७० आमदारांनी रेड्डी यांना मुख्यमंत्री बनण्यासाठी पाठिंबा दिला होता मात्र तरीही काँग्रेसने याकडे कानाडोळा केला त्यांनी के रसया यांना मुख्यमंत्रीपदी बसवले या घटनेमुळे नाराज रेड्डी यांनी आपल्या वडिलांच्या नावे वाय एस आर काँग्रेस या पक्षाची स्थापना केली यावेळी काँग्रेस मधील तब्बल १८ आमदार रेड्डी यांच्यासोबत होते पोटनिवडणुका लागल्या आणि तब्बल १५ आमदारांना विजयश्री मिळाला आंध्रप्रदेशच्या राजकारणाला एक नवा चेहरा मिळाला होता.



YSR


चंद्रबाबू नायडू आणि दिल्लीतल्या हाय कमांडशी रेड्डी यांचा संघर्ष सुरूच होता सातत्याने विरोध करत असल्यामुळे रेड्डी यांना तुरुंगाची हवाही खावी लागली होती त्यांच्या मागे चौकशी आणि तपास यंत्रणांचा ससेमीरा लागला होता या काळातही रेड्डीने संपूर्ण राज्य पिंजून काढले ३४१ दिवस मोठी रॅली काढली या दिवसात राज्याच्या राजकारणातील सगळे खाचखळगे रेड्डींनी जाणून घेतले कडप्पा जिल्ह्यातील किड्डू पुलापाया येथून संघर्ष यात्रा काढली या दरम्यान ते तब्बल दोन कोटी लोकांना भेटले जनतेत राहून त्यांचे प्रश्न त्यांनी जाणून घेतले आणि आपली एक सकारात्मक छबी निर्माण केली. प्रस्थापित सत्तेविरुद्ध आवाज उठवत त्यांनी सत्तेचा मार्ग खुला केला २०१९ ला ही पदयात्रा पूर्ण झाली २१ डिसेंबर १९७२ मध्ये जन्म झालेल्या जगन मोहन रेड्डी यांचा हा राजकीय संघर्ष प्रत्येकाला सकारात्मकता देणारा आहेच मात्र, त्यांची तुलना उद्धव ठाकरेंशी केली जाऊ शकत नाही, असा दावा माजी खासदार निलेश राणेंनी केला आहे.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.