शिवसेनेच्या सद्यस्थितीबद्दल फडणवीसांची मोठी प्रतिक्रीया!

    09-Oct-2022
Total Views |

 
शिवसेनेच्या सद्यस्थितीबद्दल फडणवीसांची मोठी प्रतिक्रीया!
मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने अंधेरी पोटनिवडणूकीपुरता शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण गोठविले आहेत. याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी प्रतिक्रीया दिली आहे. फडणवीस म्हणाले, "अशा प्रकारचे डिस्प्युट्स त्या त्यावेळी निवडणूक आयोगाने अंतिम निर्णय देण्याच्या आधी निर्णय देऊन अंतरिम निर्णय देऊन, त्या त्या वेळच्या दोन्ही गटांची चिन्ह गोठवणं आणि नाव गोठवणं आणि त्यानंतर अंतिम निर्णय देणं अशीच कार्यपद्धती स्वीकारली आहे. आपल्याकडे निवडणूक आल्यामुळे ते करणं गरजेचं होतं. म्हणून मला असं वाटतं की याच्यामध्ये काही आश्चर्य वाटण्यासारखं नाही.", असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
 
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "मला ही अपेक्षा आहे की जेव्हा निवडणूक आयोग अंतिम निर्णय त्यावेळी निश्चितपणे जी काही बाजू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडलेली आहे. ती बाजू वरचढ ठरेल असं मला वाटतं. याबद्दल भाजपलामध्ये ओढलं जातंयं. बोलायला आपण काहीही बोलू शकतो. आता कुठल्यातरी चॅनलवर मी बातमी वाचत होतो की शिवसेनेने जी नवीन नावं सांगितली आहेत. त्याच्यामागे शरद पवार आहेत. प्रत्येकजण आता काय ज्याला जे वाटतं ते सांगतो."
 
उद्धव ठाकरेंनी आपल्या गटातील नेत्यांशी संवाद साधतला. त्यावेळी मोदींचं नाणं हे खोटं नाणं ठरलं, असं वक्तव्य ठाकरेंनी केलं. आजच्या बैठकीत उद्धव ठाकरे म्हणाले, नोटबंदीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाणं खोटं ठरलं आहे. हे नाणं घासून घासून वापरलं जातं आहे. त्यामुळेच २०१९च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपने युतीसाठी आपल्याकडे यावं लागलं, अशी टीका ठाकरेंनी मोदींवर केली आहे. त्यावरही देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रीया दिली आहे.
 
ते म्हणाले, "नोटबंदीनंतरच्या सगळ्या निवडणूका मोदींच्या नाण्यांवरच जिंकले. तेही त्यांचे १८ खासदार निवडून आले. तेही मोदीजींचं नाणं दाखवूनच निवडून आले. त्यांचे जे ५६ आमदार निवडून आले. ते मोदीजींचं नाणं दाखवूनच निवडून आले. त्यामुळे बाळासाहेब हे नेहमी श्रद्धेय राहतील. आणि देशामध्ये मोदीजींचं नाणं चालतच राहील.", असे म्हणत फडणवीसांनी ठाकरेंना आरसा दाखविला.
 
याच वेळी उद्धव ठाकरेंनी "शेवटची निवडणूक आहे असं समजून जिद्दीने लढा! आपण सगळे जिंकूच कारण का बाळासाहेब आपल्या सोबत आहेत." यावरही फडणवीसांनी ठाकरेंना घेरलं. "मागच्या वेळेस मी म्हटलं होतं की प्रत्येक निवडणूक शेवटची निवडणूक समजून लढा. तर त्यांना फारच त्याचं वाईट वाटलं होतं. आणि त्यांनी माझीच शेवटची निवडणूक ठरवली होती ती. मी त्याच्यावर काही प्रतिक्रिया देणार नाही. ज्याला जशी लढवायची आहे तशी लढावी.", असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
 
"उद्धव ठाकरेंचं लाईव्ह पाहणार का?" देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रीया
"माझा पक्ष भारतीय जनता पक्ष आहे, भारतीय जनता पक्ष आपलं काम करतोय, आमचं देशात आणि राज्यात सरकार आहे, जनतेची सेवा करण्याचं आमचं काम आहे ते आम्ही करत आहोत, असेही फडणवीस म्हणाले. यावेळी उद्धव ठाकरे सायंकाळी सहा वाजता लाईव्ह येणार असल्याची माहितीही उपस्थित पत्रकारांनी दिली. त्यावर तुम्ही लाईव्ह पाहणार का, असा प्रश्न विचारला असता. "मला खूप काम आहेत.", असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंना टोला लगावला.
"हिंदूंचे सण थाटामाटात आणि धूमधडाक्यात!"
 
दहीहंडीतील तिसऱ्या गोविंदाचा मृत्यू झाला. याबद्दल प्रतिक्रीया देताना सण उत्सव हे सुरक्षिततेच पार पडायला हवेत, अशी सूचना देवेंद्र फडणवीस यांनी केली. "झालेली घटना दुर्दैवी आहे यापुढे अशा घटना घडू नये म्हणून आपण अजून प्रयत्न करू आपण दरवेळेस सांगतो की तुम्हाला जर त्याठिकाणी जी काही आपण नियम केले आहेत त्या नियमा एवढी उंच जर तुम्हाला त्याठिकाणी दहीहंडी ठेवायची असेल तर सगळी सूरक्षा पाळूनच केली पाहिजे.", असेही ते म्हणाले.
“केंद्रीय निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला जोरदार झटका देत अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी तसेच अंतिम आदेश येईपर्यंत पक्षाचे चिन्ह आणि नाव वापरता येणार नसल्याचा आदेश जारी केला आहे. आयोगाच्या या निर्णयाने शिवसेनेला मोठा धक्का बसला असून असंगाशी संग केल्याने तेलही गेले, तूपही गेले,” अशी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची अवस्था झाल्याचे दिसत आहे.
 
केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे नाव व चिन्ह गोठवल्याने उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे यांच्यापैकी कोणत्याही गटाला ते वापरता येणार नाही. या दोन्ही गटांना आता आपापल्या पक्षाचे नवे नाव आणि निवडणूक चिन्हांचे प्राधान्यक्रम सोमवारी दुपारी 1 वाजेपर्यंत आयोगापुढे सादर करायचे आहेत. या नावात त्यांना शिवसेनेचे नाव वापरण्याची मुभा निवडणूक आयोगाने दिली आहे.
"खरा अन्याय आमच्यावरच, तरी आम्हांला आयोगाचा निर्णय मान्य"
राज्याचे शालेय शिक्षण मंत्री आणि शिवसेना प्रवक्ते दीपक केसरकर यांनी ठाकरे गटाचे सर्वच दावे निराधार ठरवले आहेत. शिवसेना नाव आणि चिन्ह गोठवले गेल्याने खरा अन्याय आमच्यावर झाला आहे असा दावा करत, ठाकरे गटाकडून फक्त एक पोटनिवणूक जिंकण्यासाठी हा कांगावा केला जातोय असा घणाघात केसरकरांनी केला आहे. आम्हीच खरी आणि बाळासाहेबांच्या विचारांवर चालणारी शिवसेना आहोत आणि आमचे चिन्ह गेले याचे आम्हांला दुःख आहे असा दावा केसरकर यांनी केला आहे. तरीही निवडणूक आयोग या घटनात्मक संस्थेच्या निर्णयाचा आदर करतो आणि आम्हीच खरी शिवसेना आहोत हे आम्ही सिद्ध करूच असाही दावा केसरकर यांनी केला आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.