"तुम्ही साथ द्या, मी पुन्हा शिवसेनेचा मुख्यमंत्री करुन दाखवेल." : उद्धव ठाकरे

    07-Oct-2022
Total Views |

"तुम्ही साथ द्या, मी पुन्हा शिवसेनेचा मुख्यमंत्री करुन दाखवेल." : उद्धव ठाकरे
मुंबई: सालाबादप्रमाणे, शिवतीर्थावर दसरा मेळावा घेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर टीकास्त्र सोडले आहे. "सर्व हिंदुत्ववाद्यांनी व्यासपीठावर यावं. हिंदुत्व म्हणजे काय हे मी सांगतो. कोंबडी चोरांवर बोलणार नाही. तुम्ही पाकव्याप्त काश्मीर जिंकला तर आम्ही डोक्यावर घेऊन नाचू. हा उद्धव ठाकरे विचार पुढे नेण्याची परंपरा सुरू ठेवतोय. जिनांच्या समाधीवर माथे टेकविणारे, न बोलविता केक खायला जाणाऱ्यांची तुम्ही अवलाद. पाकिस्तानात जाऊन बिर्याणी खाणा-यांनी हिंदुत्व शिकवू नये. शिवसैनिकांना पिसाळायला लावू नका. नवी मुंबईच्या आमच्या नेत्याने पत्रकार परिषद घेतली, पोलीस त्याला त्रास देतायत. शिंदे गटात ये नाहीतर आम्ही एन्काऊंटर करू. कायदा आम्हा सगळ्यांना कायदा कळतो. कायद्याच्या चौकटीत काय बोलायचं? , हेही कळत. "
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.