दुर्गामातेचं दर्शन घेतले म्हणून हीना खानला विशिष्ठ धर्मियांकडून धमक्या!

    06-Oct-2022
Total Views |

हीना खान


हीना खान 


नवी दिल्ली :
बॉलिवूड अभिनेत्री आणि टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री हीना खान नवमीच्या दिवशी आशीर्वाद घेण्यासाठी माँ दुर्गेच्या दरबारात पोहोचली. त्यावेळी दुर्गामातेच्या मूर्तीसोबतचा फोटो हिना खानने सोशल मिडीयावर शेअर केले. मात्र, ही गोष्ट हिनाच्या धर्मातील काही लोकांना खटकली.
 
 
'ये रिश्ता क्या कहलाता है' या हिंदी मालिकेद्वारे अक्षराची भूमिका साकारून घराघरात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या हीना खानने, ४ ऑक्टोबर २०२२ रोजी रॉकी जैसवाल या मित्रासोबत दुर्गामातेचे दर्शन घेतले. त्यावेळी पारंपरीक कपडे परिधान केलेल्या हीनाने दुर्गामातेसह काही फोटो काढले व सोशलमिडियावरून शेअर केले. हिनाच्या बऱ्याचाश्या चाहत्यांनी तिचे कौतुक देखील केले. मात्र, काही युजर्सनी हिनाने दुर्गामातेचे दर्शन घेतले म्हणून तिच्या विरोधात अपशब्द वापरून धमक्या द्यायला सुरुवात केली.
 
 
एका यूजरने लिहिले की, “तुला लाज वाटत नाही का? पूर्वी तू मला आवडायचीस पण आता तू एक निर्लज्ज अभिनेत्री आहेस. पुढे नावेद खान याने हिनावर, फतवा लावणे आवश्यक आहे, अशी मागणी केली. आणखी एका युजरने म्हटले की, “तु आमच्या धर्मातील असूच शकत नाही, तसे असते तर तु असे केले नसते. तुझे नाव बदल आणि हिंदू नाव ठेव. एकंदरीतच हिंदू देवतेचे दर्शन घेतले आणि हिंदू मुलासोबत मैत्री केली म्हणून विशिष्ट धर्मियांचा तीळ पापड झाला, असे हिनाच्या ट्रोलींग वरून म्हणावे लागेल.
 

महाराष्ट्रासह देशात लव्ह जिहादच्या नावाखाली अनेक मुलींना उध्वस्थ केले जात आहे. नुकतेच बुरखा घालत नाही म्हणून वर्षीय रुपाली चंदनशिवे ( वय २३)या हिंदू मुलीची तिच्या इक्बाल शेख नामक ३६ वर्षीय पतीने केलेल्या हत्येचे प्रकरण ताज आहे. परंतु देशातील छद्म पुरोगामी वर्ग अशा घटनांकडे कायम दुर्लक्ष करत आलेला आहे आणि अशा लबाड लोकांमुळे जिहादी जमातींचे फावते.