बाललैंगिक शोषण आणि ऑस्ट्रेलिया

    03-Oct-2022
Total Views |
sextortion
 
 
जगभरात कोरोना महामारीच्या काळात ऑनलाईन बाललैंगिक शोषण आणि शोषणाच्या (ओसीएसएई) प्रकरणांमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आहे. युरोपियन युनियन, अमेरिका आदी देशांनी 2020 आणि 2021 सालामध्ये बाललैंगिक शोषण सामग्री (सीएसएएम) आणि ऑनलाईन कृत्यांमध्ये नाट्यमय पद्धतीने वाढ झाल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे ब्रिटनस्थित ‘इंटरनेट वॉच फाऊंडेशन’ने ‘ओसीएसएई’संदर्भात ही दोन वर्षे सर्वाधिक वाईट वर्षे म्हणून घोषित केली आहेत. या भागांप्रमाणेच ऑस्ट्रेलियामध्येही ऑनलाईन बेकायदेशीर सामग्रीचे संचलन आणि वापरामध्ये अभूतपूर्व वाढ झाली आहे. अहवालानुसार, कोरोना साथीच्यादरम्यान ऑस्ट्रेलियामध्ये ‘सीएसएएम’ची मागणी प्रंचड प्रमाणात वाढल्याचे दिसून आले आहे.
 
 
हा ओढा एवढा मोठा होता की अशाप्रकारची सामग्री असणारी संकेतस्थळे ‘क्रॅश’ झाली होती. त्यावर आळा घालण्यासाठी ऑस्ट्रेलियाने कठोर उपाययोजना केल्या आहेत. मुलांचे ऑनलाईन संरक्षण करण्यासाठी केंद्रीय आणि राज्य या दोन्ही स्तरांवर कठोर कायदेशीर ‘फ्रेमवर्क’ विकसित केले गेले आहेत. ऑस्ट्रेलियाचा मुलांसाठी ऑनलाईन सुरक्षितता वाढवणारा कायदा हा मुलांसाठी ऑनलाईन हानींच्या श्रेणीचा सामना करण्यासाठीचे मुख्य साधन आहे. ऑस्ट्रेलियाच्या ‘फौजदारी संहितेच्या ‘273’ आणि ‘274’ विभागांनी ‘सीएमएएम’चे उत्पादन आणि वितरणास गुन्हा ठरवले आहे आणि ऑनलाईन ग्रूमिंगला सामोरे जाण्यासाठी कायदेशीर उपायदेखील सुरू केले आहेत. याशिवाय राज्य आणि प्रदेश स्तरावर, ‘बाललैंगिक गुन्हेगार कायदा (2005)’, ‘मुलांची काळजी आणि संरक्षण कायदा (2007)’ आणि ‘बाल संरक्षण कायदा (1999)’ यासारखे कायद्यांमध्ये आता ‘सायबर’ गुन्ह्यांचाही समावेश केला आहे.
 
 
सप्टेंबर 2022 मध्ये, ऑस्ट्रेलियाच्या पोलीस खात्याने पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियन तरुणांना लक्ष्य करणार्‍या त्रासदायक ऑनलाईन ’सेक्सटोर्शन ट्रेंड’बद्दल इशारा दिला. परदेशातील गुन्हेगार ऑस्ट्रेलियन मुलांना ऑनलाईन लक्ष्य शिकार करत आहेत, त्यांना लैंगिकदृष्ट्या शोषणास भाग भाग पाडत आहेत आणि त्यांच्याकडून पैसे उकळत आहेत, असा इशारा अधिकार्‍यांनी दिला आहे. त्यामुळे ‘ओसीएसएई’ विरुद्धच्या लढ्यात मुलांना समान भागीदार म्हणून समाविष्ट करण्याच्या प्रयत्नातून ऑस्ट्रेलियन सरकार ऑनलाईन सुरक्षा युवा सल्लागार परिषद स्थापन करत आहे. कौन्सिलमध्ये 13 ते 24 वर्षे वयोगटातील सुमारे 20 ऑस्ट्रेलियन नागरिकांचा समावेश असेल, ही परिषद सरकारला ऑनलाईन बदलत्या ट्रेंड्सविषयी सुचित करण्याचे काम करणार आहे.
 
 
नवीन कायदे पारित करून आणि त्याची सर्वसमावेशक राष्ट्रीय रणनीती सुरू करण्याबरोबरच, महामारीच्या काळात ऑस्ट्रेलियाने भागधारकांना संवेदनशील करण्यासाठी आणि ‘ओसीएसएई’चा सामना करण्यासाठी त्यांची क्षमता निर्माण करण्याचे असलेले प्रयत्न सुरू ठेवले आहेत. विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांना लक्ष्य करणार्‍या विविध माहिती संसाधनांचा प्रचार करण्यासाठी ऑस्ट्रेलियन शाळा प्रणालींशी सातत्याने सहभाग घेतला आहे. त्याची ‘स्कूल कम्युनिटी एंगेजमेंट प्लॅन’ फेब्रुवारी 2020 पासून कार्यान्वित आहे आणि ‘ओसीएसएई’सह ऑनलाईन जोखमींबद्दल जनजागृती करण्यासाठी आणि मुलांविरुद्धच्या ऑनलाईन गुन्ह्यांची तक्रार करण्यासाठी यंत्रणा या योजनेने शाळांसाठी ‘ई-सेफ्टी टूलकीट’चा वापर केला आहे.
 
 
मुलांविरुद्ध ’सायबर’ गुन्ह्यांचे आंतरराष्ट्रीय स्वरूप पाहता, ऑस्ट्रेलियाने देशांतर्गत प्रयत्नांना चालना देणारी आणि ‘ओसीएसएई’चा सामना करण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्षमता मजबूत करू शकणार्‍या सायबर भागीदारी तयार करण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत. ऑस्ट्रेलियाने या विषयामध्ये तांत्रिक आणि कायदेशीर बाबींमध्ये पुढाकार घेतला आहे. 2021 मध्ये, ऑस्ट्रेलियाने दक्षिण कोरिया आणि फिजीसोबत ऑनलाईन बालसुरक्षा संबंधित द्विपक्षीय करार केले. त्यामुळे यांसारख्या उपक्रमांना सातत्य, विस्तारित आणि जोमाने प्रोत्साहन दिले पाहिजे. कारण, एकत्र काम केल्याने, मजबूत बालसंरक्षण प्रणाली विकसित करण्यात, गुन्हेगारांना रोखण्यासाठी, ‘बालसुरक्षित संस्कृतींचा’ प्रचार करण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा अनुभव जगासाठी फायदेशीर ठरू शकतो.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.