भारतात ५जी युग अवतरले,पंतप्रधानांच्या हस्ते शुभारंभ!

    03-Oct-2022
Total Views |


नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडिया मोबाइल काँग्रेस (आयएमसी २०२२) मध्ये ५जी सेवा सुरू केली. पहिल्या टप्प्यात अहमदाबाद, बेंगळुरू, चंदीगड, चेन्नई, दिल्ली, गांधीनगर, गुरुग्राम, हैदराबाद, जामनगर, कोलकाता, लखनौ, मुंबई आणि पुणे या १३ शहरांमध्ये ५जी कनेक्टिव्हिटी सुरू केली जाईल. यानंतर ५जी देशाच्या प्रत्येक भागात पोहोचवले जाईल.
 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी आयएमसी २०२२ ला संबोधित करताना म्हणाले, तंत्रज्ञान एक नशा आहे, त्याचा योग्य वापर करा. आज देशात २०० हून अधिक मोबाईल कंपन्या आहेत. पूर्वी आपण मोबाईल आयात करत होतो आणि आज निर्यात करतोय.आजच्या वेगाने बदलणाऱ्या जगात भारताला शिखरावर जाण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही." या जागेवर आमचा हक्क आहे. भारत आणि भारतीय यापेक्षा कमी गोष्टींवर तोडगा काढू शकत नाहीत. भारत चौथ्या औद्योगिक क्रांतीचे नेतृत्व करेल.
 
 
पुढे ५जी सेवेचे महत्व अधोरेखित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले कि, २१व्या शतकातील सर्वात मोठी शक्ती सुरू झाली आहे. यामुळे देशातील तंत्रज्ञान क्षेत्रात क्रांती होईल. तांत्रिक क्षेत्रात कोणावरही अवलंबून राहणार नाही. डिजिटल इंडिया हे देशाच्या विकासाचे व्हिजन आहे. देशात ५G सेवेच्या मदतीने इंटरनेटचा वेग १० पटीने वाढेल आणि मुले नव्या युगाचा एक भाग बनतील.
 
 
भारतातील 5G ची सुरुवात ही भारताच्या दूरसंचार इतिहासातील सामान्य घटना नाही. हे १४० कोटी भारतीयांच्या आशा आणि आकांक्षा आपल्या खांद्यावर घेऊन जाते. 5G सह, भारत सब का डिजिटल साथ आणि सब का डिजिटल विकासाच्या दिशेने एक मजबूत पाऊल उचलेल. भारताने थोडी उशीरा सुरुवात केली असेल, परंतु आम्ही जगापेक्षा उच्च दर्जाची आणि अधिक परवडणारी ५जी सेवा आणणार आहोत, असा विश्वास उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी व्यक्त केला.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.