महाविकास आघाडी खोटेच बोलत आहे! उद्योगक्षेत्रातूनच टीकास्त्र

    28-Oct-2022   
Total Views |
laghu udyog bharati
 
मुंबई : महाराष्ट्रात येऊ शकणारा टाटा सन्सचा एअरबस प्रकल्प गुजरातला गेल्याने महाविकास आघाडीचे नेते जोरजोरात बोंब मारत आहेत. पण प्रत्यक्षत हा प्रकल्प महाराष्ट्रात येऊ शकला नाही हे नाकर्तेपण महाविकास आघाडीचेच आहे अशी टीका आता खुद्द उद्योगक्षेत्रातूनच होत आहे. सप्टेंबर २०२१ मध्येच या प्रकल्पासाठी जागांचे प्रस्ताव मागण्यास सुरुवात झाली होती. कर्नाटक, उत्तरप्रदेश, आंध्रप्रदेश आणि गुजरात या चार राज्यांचे प्रस्तावच आले होते. यात कुठेच महाराष्ट्र सरकारचे नाव नाही. नंतरही महाराष्ट्र सरकारने शक्य असूनही कुठलेच प्रयत्न केले नाहीत. यामुळे हा प्रकल्प गुजरातला गेला हे पाप महाविकास आघाडीचेच आहे हे निश्चित असे मत उद्योगक्षेत्रातूनच व्यक्त होत आहे.
 
देशातील उद्द्योगक्षेत्रासाठी काम करणारी एक अग्रगण्य संस्था म्हणून ओळख असलेल्या लघु उद्योग भारतीचे महाराष्ट्र अध्यक्ष रवींद्र वैद्य यांच्याशी आम्ही चर्चा केली. यावर त्यांनी महाविकास आघाडी सरकारचे या उद्योगासाठी पाठपुरावा करण्याचे कुठलेही धोरणच नव्हते अशी प्रतिक्रिया दिली आहे. "२०२१ मध्ये या प्रकल्पासाठी प्रस्ताव मागितले होते पण तेव्हा महाविकास आघाडी सरकारने कुठलाच प्रतिसाद दिला नव्हता, ना त्या कंपनीच्या संचालकांशी चर्चा केली होती, ना त्यांना कुठला प्रस्ताव सादर केला होता. कुठलाही उद्योग आपल्याकडे यावा यासाठी आपल्यालाच प्रयत्न करावे लागतात, जे गुजरातने केले म्हणून हा प्रकल्प गुजरातला गेला. जसे वेदांता - फॉक्सकॉनच्या वेळी जसा महाविकास आघाडी सरकारने नाकर्तेपणा दाखवला तसाच तो आताही दाखवला. ज्याचा परिणाम आपल्यासमोर आहे" अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
 
तर महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्योग क्षेत्राची फार मोठी हानी झाली आहे अशी प्रतिक्रिया लघु उद्योगभारतीचे महाराष्ट्र महामंत्री भूषण मर्दे यांनी दिली आहे. "हा प्रकल्प महाराष्ट्रात येऊ शकला नाही यात काही आश्चर्य नाही कारण महाविकास आघाडी सरकारच्या अजेंड्यावर उद्योगांना प्रोत्साहन देणे कधीच नव्हते. त्यामुळे महाराष्ट्रात उद्योग येण्यासाठी कुठलेही प्रयत्न महाविकास आघाडीने केले नाहीत. उलट महाविकास आघाडीच्या काळात उद्योगांना या ना त्याप्रकारे त्रास देण्याचेच धोरण होते, त्यामुळे आहेत ते प्रकल्पही महाराष्ट्रातून जायला निघाले होते. त्यामुळे हा प्रकल्प महाराष्ट्रातून गेला याला कारण महाविकास आघाडीच" अशी प्रतिक्रिया भूषण मर्दे यांनी दिली आहे.
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

हर्षद वैद्य

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये उपसंपादक (वेब आणि प्रिंट) म्हणून कार्यरत. रुईया महाविद्यालयातून गणित या विषयात पदवीचे शिक्षण घेतले. आर्थिक क्षेत्राशी संबंधित वृत्तांकन आणि लेखन. भारतीय संगीत, इतिहास या विषयांमध्ये विशेष रस. महाविद्यालयीन स्तरावर विविध स्पर्धांमध्ये प्राविण्य. अर्थशास्त्र विषयात महाविद्यालयात संशोधन केले आहे. शैक्षणिक, सेल्स आणि मार्केटिंग क्षेत्राचाही अनुभव.