Uddhav Thackeray सरकारच्या काळात फिस्कटलं Tata Air Bus चं डील Uddhav Thackeray | Eknath Shinde

    28-Oct-2022
Total Views |



उद्धव ठाकरे अडीच वर्षे स्वतःला घरात कोंडून घेतल्यानेच 'एअरबस टाटा' गुजरातमध्ये गेली. एयरबसशी चर्चा न करता प्रकल्प महाराष्ट्रात कसा येऊ शकतो ? यावर महाविकास आघाडीने मार्गदर्शन करावे. तब्बल अडीच वर्षात एकही प्रकल्प महाराष्ट्रात का आले नाहीत? याचा अभ्यास जयंत पाटील, आदित्य ठाकरे, अंबादास दानवे यांनी केला आहे का? कोणताही उद्योग राज्यात स्वतः हुन येत नाही, उद्योग धंद्याना वातावरण पोषक हवं. खंडणी उकळून, उद्योगपतींच्या घरासमोर स्फोटके ठेवून, राज्यातील उद्योग धंदे बंद उद्धव ठाकरेनी करायला लावले. त्याला साथ राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. ४ महिन्यात कोणत्याही प्रकल्पाची पायाभरणी होत नाही. यासाठी वर्षे दोन वर्षे प्लॅनिंग, बिडिंग असतो, असेही भाजपने आपल्या सोशलमिडीयातील पोस्टमध्ये म्हंटले आहे.


भाजपने मांडलेला घटनाक्रम पुढीलप्रमाणे


★ भारताने १२६ C-295 Medium Combat Aircraftसाठी विविध निविदा मागवल्या होत्या. त्यात एयरबसची निवड करण्यात आली.
★ मोदीजींनी २०१५ साली एयरबसच्या फॅक्टरीला भेट दिली. त्यावेळी या विमानांचा स्पेनमधून पुरवठा करण्याचा प्रस्ताव एयरबसने ठेवला.
★ २०१७ मध्ये मेक इन इंडिया अंतर्गत यातील काही विमाने भारतात बनवायची मागणी भारत सरकारने केली.
★ त्यानंतर टाटा समूहासोबत सामूहिक भागीदारी करून एयरबसने २०२० मध्ये भारतात प्रकल्प टाकायला पाहणी सुरु केली. यावेळी महाराष्ट्र सरकारने कोणताही प्रस्ताव दिल्याची नोंद नाही.


★ सप्टेंबर २०२१ मध्ये बंगळूरू, हैद्राबाद, गुजरात आणि उत्तर प्रदेश येथील प्रस्ताव तपासून ढोलेरा येथे प्रकल्प टाकायचा प्राथमिक निर्णय घेतला. या काळात महाराष्ट्र सरकारने कोणतीही प्रस्ताव व या प्रकल्पाबाबत चर्चा झाल्याची नोंद सरकार दरबारी कुठेही आढळून आलेली नाही.


★ फेब्रुवारी 2022 ला पुन्हा एकदा प्रकल्पाचा पुन्हा विश्लेषण करण्यात आले. यावेळी सुद्धा महाराष्ट्र सरकारकडून कोणीही एयरबसच्या अधिकाऱ्यांना भेटल्याची नोंद नाही.


★ सप्टेंबर 2022 मध्ये एयरबसच्या प्रकल्पासाठी (6 प्रस्तावित प्रकल्प आहेत) महाराष्ट्र सरकार उत्सुक असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करताना बोलल्याची नोंद आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.