WhatsApp Outage : व्हॉट्सअॅप बंद आणि ग्रहणाचा काही संबंध आहे का? जाणून घ्या लेखातून
25-Oct-2022
Total Views |
दुपारी साडेबाराच्या सुमारास अचानक व्हॉट्सअॅप वरून अचानक मेसेजेस जाणे बंद झाले, हळूहळू फक्त मुंबईतूनच नाही तर संपूर्ण देशातून व्हॉट्सअॅप बंद असल्याच्या बातम्या येण्यास सुरुवात झाली. कोणीच कोणाला मेसेज पाठवू शकत होते ना मेसेजेस येऊ शकत होते. सगळं कामच ठप्प झालं. बघता बघता ३० हजार युजर्सनी व्हॉट्सअॅप बंद असल्याची तक्रार नोंदवली होती.
दुपारी साडेबाराच्या सुमारास बंद पडलेले व्हॉट्सअॅप सुरु होण्यास तब्बल दीड तास लागले आणि २ वाजून ६ मिनिटांनी व्हॉट्सअॅप परत सुरु झालं. पण तोपर्यंत संपूर्ण जगातील २ अब्ज युजर्सना त्याचा फटका बसला होता, नक्की हे का झालं? व्हॉट्सअॅप नेमकं काम कसं करतं? व्हॉट्सअॅप बंद होणं हे इतका महत्वाचे का आहे? ग्रहणाचा आणि हे व्हॉट्सअॅप बंदचा काही संबंध आहे का? हे सर्व जाणून घेऊया या लेखातून.
आता पर्यंत आपण आपल्या तीनच मूलभूत गरजा मानत होतो अन्न, वस्त्र आणि निवारा पण आजच्या युगात अजून एक गोष्ट आपल्या रोजच्या जगण्याचा अविभाज्य भाग बनली आहे ती म्हणजे व्हॉट्सअॅप . आपल्या रोजच्या जीवनाचा व्हॉट्सअॅप एक अविभाज्य भाग बनलंय. जगभरात जाळे पसरलेल्या या व्हॉट्सअॅपचे तब्बल २ अब्जहून जास्त युजर्स आहेत आणि तब्बल ५५०० कोटी मेसेजेस रोज पाठवले जातात.
यावरून आपल्याला अंदाज येईल की मोठी अजस्त्र यंत्रणा हे सगळं संभाळण्यासाठी लागणार असेल. मागच्यावर्षी ६ ऑक्टोबरला असंच व्हॉट्सअॅप बंद पडले होत, त्याहीवेळी काहीतरी तांत्रिक कारणानेच हे झालंय असे कंपनीकडून सांगण्यात आले होते. ६ ऑक्टोबरचा व्हॉट्सअॅपचा धक्का एवढा मोठा होता की अमेरिकी भांडवली बाजारात व्हॉट्सअॅपची मदर कंपनी फेसबुकचे शेअर्स पडले होते. आताही व्हॉट्सअॅप बंद झाल्याची गंभीर दखल घेऊन भारत सरकारने याबाबत फेसबुककडे स्पष्टीकरण मागितले आहे.
यासाठी मुळात व्हॉट्सअॅप काम कसे करते हे आधी बघायला हवे, एन्ड टू एन्ड इन्क्रिप्शन बेसिसवर व्हॉट्सअॅप काम करते म्हणजे व्हॉट्सअॅप मेसेज करणारा आणि ज्याला पाठवलाय तो असे दोघेच तो मेसेज वाचू शकतात. एकदा एका युजर कडून मेसेज पाठवला गेला की तो एका स्पेसिफिक इन्क्रिप्शन प्रोटोकॉल मध्ये कन्व्हर्ट होतो. व्हॉट्सअॅपच्या सर्वरवर हा मेसेज त्या रिसीवर कडे पाठवला जातो.
त्यानंतर त्याचे यूनीक क्रिप्टोग्राफिक Keyच्या आधारे डिक्रीप्ट करून तो त्या रिसिवर ला मेसेज दिसायला लागतो अशी ही व्हॉट्सअॅपची प्रोसिजर आहे. ही संपूर्ण प्रक्रिया अत्यंत सुरक्षित दिसत जरी असली तरी तसे वास्तवात अजिबात नाही. त्यामुळे व्हॉट्सअॅप हॅक होण्याचा धोका कायम असतोच असतो. पण त्यावर मात करण्यासाठी फेसबुक कडून सातत्याने नवीन नवीन तंत्रे शोधून काढली जात आहेत.
त्यामुळे या व्हॉट्सअॅप बंद होण्यामागे हे हॅकिंगचे काही रॅकेट होते की तो एक खरोखरच तांत्रिक बिघाड होता? याबद्दल व्हॉट्सअॅपची मालक कंपनी फेसबुक कंपनीकडून काहीच स्पष्टीकरण दिले गेलेले नाही. दुसरीकडे सायबर तज्ज्ञांनी सायबर सुरक्षेच्या अनुषंगानेही याबद्दल चिंता व्यक्त केलेली आहे. व्हॉट्सअॅप हे प्रामुख्याने मेसेंजर अँप म्हणून वापरले जाते. तसेच युपीआयद्वारे पैसे पाठवण्याची सोयही यावर आहे.
व्हॉट्सअपबद्दल आणखी एक महत्वाचा फिचर म्हणजे व्हॉट्सअॅप बिझनेनस. अनेक किरकोळ दुकानदार, छोटे उद्योजकही याच माध्यमांचा वापर करतात. त्यामुळे अडीच तासांसाठी या सर्व प्रक्रीयेला फटका बसला हे निश्चित.. या सगळ्यात एक कयास असाही लावला गेला की व्हॉट्सअप बंद होण्याचं प्रमुख कारण हे सुर्यग्रहणही असू शकतं मात्र, आपण वरील ही सगळी प्रक्रिया बघितली की त्याचा आणि ग्रहणाचाही काहीच संबंध नाही हेही लक्षात येईलच.पण व्हॉट्सअॅप हे एक अँप आहे, तेही कधी कधी बंद पडू शकते आणि यात नवीन आणि जग बुडायला लागल्यासारखी परिस्थिती होण्याचे काहीच कारण नाही तेव्हा कुठलेली अँप वापरताना काळजी घ्या, सुरक्षा जपा आणि कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका.