T20 World Cup 2022 : २०२२ च्या T२० विश्वचषक स्पर्धेमध्ये टीम इंडिया आणि पाकिस्तानविरुद्धच्या मोहिमेला सुरुवात होण्यापूर्वी टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध सराव सामना खेळत आहे. या सराव सामन्यात भारताचा स्टार ओपनिंग बॅट्समन केएल राहुलने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा अक्षरशः धुव्वा उडवला आहे. यातूनच केएल राहुलने हे स्पष्ट केले आहे की, T२० विश्वचषकाच्या मुख्य सामन्यांसाठी भारत सज्ज आहे.
केएल राहुलने टी-२० वर्ल्डकपच्या सराव सामन्यामध्ये २७ चेंडूत अर्धशतक ठोकलं. तर या सामन्यात ३३ चेंडूंमध्ये ५७ धावांची स्फोटक खेळी खेळत ६ चौकार आणि ३ षटकारांचा लगावले आहेत. रोहित शर्मा आणि केएल राहुल ही जोडी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यासाठी सलामी जोडी आहे.
एकीकडे रोहित शर्मा अगदी संथ गतीने फलंदाजी करत असतानाच दुसरीकडे मात्र केएल राहुल ऑस्ट्रेलियन गोलंदाजांसमोर झंझावती फलंदाजी करताना दिसला. केएल राहुल आणि रोहित शर्मा यांनी ७.३ षटकात ७८ धावांची सलामी दिली. गुरुवारीच केएल राहुलने वेस्टर्न ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यामध्ये ७४ धावांची धडाकेबाज खेळी खेळली.