अंधारेंमुळे पेडणेकर नाराज?

    15-Oct-2022
Total Views |
shivsena
 
 किशोरी पेडणेकर
 
मुंबई : मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर ठाकरे गटात नाराज असल्याच्या चर्चा सुरु आहेत. ठाकरे गटाच्या महाप्रबोधन यात्रेत किशोरी पेडणेकर यांना डावलले जात आहे, असे बोलले जाते. त्यात उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व आणि शिवसेनेशी देणंं घेण नसणाऱ्या सुषमा अंधारे यांना बाहेरून आयात केल्याने किशोरीताईंचे पक्षातील वजन कमी झाले आहे.
 
 
ठाकरे गटाच्या शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यात सुषमा अंधारे यांचे भाषण नेतृत्वाला आवडले, अशी सूत्रांकडून माहिती मिळते. त्यामुळे ठाकरे गटाच्या महाप्रबोधन यात्रेसाठी कालपरवा पक्षात दाखल झालेल्या अंधारेंसाठी किंवा भास्कर जाधव यांच्यासाठी पायघड्या घातल्या जातात तर पक्षासाठी रक्ताचे पाणी पाणी केलेल्या किशोरी पेडणेकर यांना मात्र साधे बोलवले जात नाही.
 
 
शालिनी ठाकरे यांची ट्विटरद्वारे खोचक टीका -
 
मनसेच्या फायरब्रांड नेत्या शालिनी ठाकरे यांनी ठाकरे गटाची शिवसेना आणि अंधारे यांचा ट्वीटरद्वारे चांगलाच समाचार घेतला आहे. आपल्या ट्वीटमध्ये शालिनी ठाकरे म्हणाल्या कि, "अंधारात तीर मारणाऱ्या नवं शिवसैनिकांमुळे माजी महापौर व कांदे बाई यांचे वांदे झाल्याची चर्चा शिल्लक सेनेत सुरू आहे...महाप्रबोधन यात्रेत बोलावले नाही म्हणून त्यांनी प्रमुखांकडे तक्रार करूनही उपयोग झाला नाही. मूळ सैनिक यांच्यावर अन्याय करून उपऱ्याना संधी ही नवीन शिल्लक सेना..अजब आहे".
 
 
 
 
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून शिवसेनेत उठाव केला त्याचा परिणाम शिवसेना दोन गटांमध्ये विभागण्यात झाला. उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांकडे लक्ष न देण्याच्या स्वभावामुळेच पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते शिंदे गटात सामील झाले. आता हिंदुत्व विरोधी आणि आक्रस्ताळी भाषणे करणाऱ्या सुषमा अंधारेंच्या प्रवेशाने पक्षातील कार्यकर्त्यामध्ये नाराजी आहे.