‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ची भूषण यांची ‘ऑटोमेटन-एआय’

    14-Oct-2022   
Total Views |

bhushan mathiyan
 
‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ यासारख्या नवीन आणि सतत ‘अपडेट’ होणार्‍या क्षेत्रात काम करणे हे तसे अवघडच. पण, स्वतः परदेशातून उच्च शिक्षण घेऊनसुद्धा भारतातच आपला उद्योग सुरू करणे आणि त्यातही शिक्षण, ‘रिटेल’, ‘डेटा मॉनिटरिंग’ यांसारख्या क्षेत्रांत काम करत आपले स्वतःचे ‘प्रॉडक्ट’ विकसित करण्याचे काम फारच कमी लोक करू शकतात आणि तीच किमया केली आहे, ‘ऑटोमेटन-एआय’च्या भूषण मथियन यांनी. त्यांच्या याच स्टार्टअपची माहिती या लेखातून जाणून घेऊया...
 
 
आजच्या युगात आपण सर्वच जण ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ म्हणजे ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ या तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष वापर करीत आहोत. बर्‍याच क्षेत्रात तर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जोरावर अख्खा उद्योग-व्यवसाय चालवला जातो. परंतु, याच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराबद्दल आपल्याकडे अजूनही अनेक गैरसमज आहेत आणि ते गैरसमज आपल्या या क्षेत्रातील प्रगतीच्या आड येतात. हेच सर्व गैरसमज दूर करून या क्षेत्रातील प्रगतीची दारे उघडण्यासाठी स्वबळावर एखादा उद्योग उभा करण्याचे काम कोणी करून दाखवले, तर खूप मोठी गोष्ट ठरेल. हाच विचार केलाय, भूषण मथियन यांनी त्यांच्या ‘ऑटोमेटन-एआय.’ च्या माध्यमातून...
‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ या तंत्रज्ञानाबद्दल असा एक उगीच समज पसरला आहे की, या तंत्रज्ञानाने लोकांचे रोजगार हिसकावले जातील. पण, आपण हे लक्षात घेतले पाहिजे की, या तंत्रज्ञानानाने अजिबात असे काहीही होणार नाही. या तंत्रज्ञानाने लोकांचे काम उलट अजून सुलभ होणार आहे आणि त्यातून लोकांचा फायदाच होणार आहे. त्यामुळे या तंत्रज्ञानाने लोकांच्या नोकर्‍या वगैरे जातील, हा गैरसमज आहे आणि उलट या तंत्रज्ञानाच्या वापराने फायदाच होणार आहे. तेव्हा भारतात या तंत्रज्ञानात पुष्कळ संशोधनाची आवश्यकता आहे. त्यामुळे अशा पद्धतीचे उद्योग उभे राहणे गरजेचे आहे. याच हेतूने या ‘स्टार्टअप’ची स्थापना झाली आहे.
ही कंपनी सुरू करण्याआधी भूषण अमेरिकेत उच्चशिक्षण घेत होते. ’इंजिनिअरिंग’ केल्यावर भूषण यांनी ’आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ या क्षेत्रात ‘मास्टर्स’चे शिक्षणही पूर्ण केले. यातूनच त्यांच्या मनात विचार आला की, आपण याच क्षेत्रात उद्योग सुरू केला तर? आणि ज्या क्षेत्रात शिक्षण घेतले आहे, त्याच क्षेत्रात स्वतःचा व्यवसाय भूषण यांनी सुरू केला.
 
 
 
 
याच विचारातून त्यांच्या ‘ऑटोमेटन-एआय’ची स्थापना झाली. सुरुवातीला त्यांनी ‘डेटा सर्व्हिस’ क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. त्यातून ’डेटा मॉनिटरिंग’ यांसारख्या क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. पुढे याच क्षेत्रात काम करत असताना त्यांनी स्वतःचे एक प्रॉडक्ट ’अर्वींळीं स्टुडिओ’ तयार केले. यातून सर्वात महत्त्वाचे म्हणजे, आता या क्षेत्रात जी काही प्रॉडक्ट्स काम करत आहेत, ती सर्व वेगवेगळ्या स्वरूपात काम करत असतात. प्रत्येक गोष्टीसाठी वेगळा म्हणजे ‘डेटा मॉनिटररिंग’, ‘डेटा अ‍ॅनालिसिस’, ‘डेटा सर्व्हिस’ या सर्व गोष्टींचे काम चालते. त्यातून आपल्याकडे असे कुठलेही प्रॉडक्ट नाही की, जे या सर्व ‘सर्व्हिसेस’ एकाच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देईल आणि या सर्व गोष्टी मिळवण्याच्या कामाचा वेळ वाचेल, असे खूप काम या प्रॉडक्टमधून केले जाते. या प्रॉडक्टचे लॉन्चिंग त्यांनी दुबईमध्ये ‘लायटेक्स फेस्टिव्हल’मध्ये 2021 मध्ये केले. यातून सर्वच सर्व्हिसेस या एकाच ठिकाणी कमी वेळेत पूर्ण करता येतील.
 
 
  
या क्षेत्रात काम करत असताना, या क्षेत्राच्या वापराबद्दल आणि कुठे-कुठे हे क्षेत्र काम करू शकते, याबद्दल बोलणे महत्त्वाचे आहे. कारण, हे उगवते क्षेत्र आहे. यात खूप नवे संशोधन होणे गरजेचे आहे. जसे की, आपण एक फोन केला की, आपल्याकडे आपल्याला ‘ऑर्डर’प्रमाणे जेवण येते. तसेच आपल्याला कुठलीही गोष्ट ऑनलाईन मागवता येते, औषधे मागवता येतात, हे सर्वच फक्त या कृत्रिम बुद्धिमत्तेमुळेच शक्य आहे. एकाच वेळी एकाच ठिकाणी लाखो लोकांच्या संपर्कात येणे शक्य होते, ते या कृत्रिम बुद्धिमत्तेमुळेच. तसेच, कोरोना साथीच्या काळात अनेक लोकांची कामे करणे शक्य झाले ते निव्वळ या कृत्रिम बुद्धिमत्तेमुळेच. वैद्यकीय क्षेत्रातही या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मार्फत अनेक संशोधने करता आली. याच तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्याला लस संशोधनातही प्रगती करणे शक्य झाले. लस संशोधन करणे तिच्या वितरणातील सर्व अडचणी दूर करणे, या सर्व गोष्टी या कृत्रिम बुद्धिमत्तेच्याच वापराने शक्य झाला.
 
 
याच्या एक पाऊल पुढे जाऊन आत या कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर शिक्षण क्षेत्रातही करण्याचे काम भूषण यांनी सुरू केले आहे. यासाठी यांचा एक दृष्टिकोन आहे की, या तंत्रज्ञानाचा वापर करून आपण शिक्षण क्षेत्रात पूर्ण बदल घडवू शकतो. यासाठी आपल्याकडे आपण जे शिकतोय, त्याचा आपल्याला ‘रिअल लाईफ एक्सपीरिअन्स’ येणे गरजेचे आहे. प्रत्येक क्षेत्रात तसे होणे गरजेचे आहे. त्यासाठी विद्यार्थी आणि शिक्षक यांना अतिशय सुलभ आणि सुयोग्य पद्धतीने वापरता येईल, अशी ‘ऑटोमेटन-एआय’ लॅब्सची स्थापना केली आहे, त्यातून विद्यार्थी आणि शिक्षक या दोघांनाही त्याचा फायदा होईल. त्यातून आता भूषण यांनी अनेक शिक्षण संस्थांना या पद्धतीची सेवा देण्यास सुरुवात केली आहे. ज्यातून मोठमोठ्या विद्यापीठांतही या लॅब्सचा वापर होईल आणि त्याचा फायदा शिक्षक तसेच विद्यार्थी या दोघांनाही होईल. शिक्षण क्षेत्रात सर्वात सध्या ज्या गोष्टीची कमतरता आहे ती म्हणजे, विद्यार्थी जे शिक्षण घेत असतात, त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेणे शक्य नाही. त्याचमुळे त्यांच्या शिक्षणात हीच कमी आहे. आपण जर हा प्रत्यक्ष अनुभव देऊ शकलो, तर नक्कीच फायदा होईल. त्यामुळे आता आपण या कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून हा अनुभव आपण येऊ शकतो.
 
 
 
या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात काम करण्यासाठी ज्या उद्योजकांना पुढे यायचे आहे, त्यांनी आधी हे लक्षात घ्यावे की, या क्षेत्रात उद्योग सुरू करणे हे थोडे खर्चिक काम आहे. कारण, या क्षेत्रात जर उद्योग सुरु करायचा असेल, तर आपल्याकडे माहिती म्हणजे ‘डेटा’ असणे गरजेचे आहे आणि तोच मिळविणे गरजेचे आहे. कारण, त्याशिवाय काम करणे शक्य नाही. तेव्हा या क्षेत्रात येणार्‍या सर्व उद्योजकांनी आधी हा ‘डेटा’ जमवावा. त्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे, त्या ’डेटा’चा उपयोग करून त्यापासून आपले काम करणे, प्रॉडक्ट तयार करणे, हे करण्यासाठी खूप जास्त वाव आहे. आज जवळपास असे एकही क्षेत्र नाही, ज्यात या कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर होत नाही. त्यामुळे या क्षेत्रात काम करायला नक्कीच पुढे यावे.
 
 
कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या एका सर्व क्षेत्र व्यापणार्‍या तंत्रज्ञानात स्वतःचा व्यवसाय सुरु करणे आणि त्यात आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर एखादे प्रॉडक्ट तयार करणे, खूप कठीण आहे आणि तेच कठीण काम साध्य करून दाखवणारे भूषण मथियन यांचा प्रवास खूप महत्त्वपूर्ण आहे.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

हर्षद वैद्य

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये उपसंपादक (वेब आणि प्रिंट) म्हणून कार्यरत. रुईया महाविद्यालयातून गणित या विषयात पदवीचे शिक्षण घेतले. आर्थिक क्षेत्राशी संबंधित वृत्तांकन आणि लेखन. भारतीय संगीत, इतिहास या विषयांमध्ये विशेष रस. महाविद्यालयीन स्तरावर विविध स्पर्धांमध्ये प्राविण्य. अर्थशास्त्र विषयात महाविद्यालयात संशोधन केले आहे. शैक्षणिक, सेल्स आणि मार्केटिंग क्षेत्राचाही अनुभव.