अरविंद केजरीवाल
नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि त्यांचे विविध विभागातील अधिकारी जनतेने विचारलेल्या आरटीआय प्रश्नांना उत्तर देत नसल्याचा आरोप भाजपने केला आहे. असे करून संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीकडून जनतेच्या त्या अधिकारांचे उल्लंघन केले जात आहे, ज्यासाठी केजरीवाल स्वतः आंदोलन करत असतात,. ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे म्हणत भाजपने केजरीवाल यांच्याकडे स्पष्टीकरणाची मागणी केली आहे. केंद्रीय मुख्य माहिती अधिकार्यां नी केलेल्या तक्रारीनंतर भाजपने हा आरोप केला आहे.
भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते गौरव भाटिया यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, दिल्ली सरकारच्या विविध मंत्रालय आणि विभागांमध्ये भ्रष्टाचाराचा मोठा खेळ खेळला जात आहे. यामुळेच या विभागांमध्ये कोणतीही माहिती मागितली जात असताना संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती दिली जात नाही. दिल्ली सरकारच्या उत्पादन शुल्क विभाग, शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, जल बोर्ड आणि विद्युत विभागात यापूर्वी भ्रष्टाचाराची अनेक गंभीर प्रकरणे समोर आली आहेत. केवळ त्यांच्याशी संबंधित माहिती लपवण्यासाठी आरटीआय प्रश्नांना उत्तरे दिली जात नसल्याचा आरोप केला जात आहे.
ते म्हणाले की, संवैधानिक पद भूषवल्यानंतरही अरविंद केजरीवाल उपराज्यपालांच्या पत्राचे वर्णन 'प्रेम पत्र' असे करतात. हा केवळ गंभीर पत्राची खिल्ली उडवण्याचा विषय नाही, तर घटनात्मक संस्थांवर विश्वास द्योतक असून हे वक्तव्य म्हणजे घटनात्मक संस्थांची टिंगलटवाळी करण्याचा हा प्रकार आहे. ही दुर्दैवी बाब असून अरविंद केजरीवाल यांनी या मुद्द्यावरून स्पष्टीकरण द्यावे.