"जावेद हबीबचे सर्व सलून ४८ तासांत बंद करा, नाहीतर..."

भाजप आमदार आकाश विजयवर्गीय यांचा इशारा

    08-Jan-2022
Total Views |

jawed habib
नवी दिल्ली : प्रसिद्ध हेअरस्टायलिस्ट जावेद हबिब याचा एक व्हिडियो चांगलाच चर्चेत आला. यामध्ये हेअर कटींग करताना जावेद हबीब यांनी थुंकीचा वापर केला होता. या व्हिडियोनंतर त्याने आपला माफीनामासुद्धा दिला होता. असे असले तरीही त्याच्यावर देशभरातून टीका करण्यात येत आहे. इंदूरचे भाजपा आमदार आकाश विजयवर्गीय यांनी इंदूरमध्ये जावेद हबीब चालवणारे सर्व सलून ४८ तासांच्या आत बंद करण्याचा इशारा दिला. असे न केल्यास आंदोलन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
 
 
 
 
 
भाजप नेते आकाश विजयवर्गीय यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर करत म्हंटले आहे की, "अलीकडेच मी जावेद हबीब यांचा व्हिडिओ पाहिला. ज्यामध्ये त्यांने एका महिलेला स्टेजवर आमंत्रित केले आणि केशरचना करताना तिच्या डोक्यावर थुंकले. मी याचा तीव्र विरोध करतो आणि तुम्हा सर्वांना विनंती करतो की, किमान इंदूरमध्ये तरी जावेद हबीबच्या नावाने चालणाऱ्या सर्व संस्था ४८ तासांच्या आत बंद कराव्यात. इंदूरमध्ये आम्ही त्यांच्या संस्था चालू देणार नाही." असे आव्हान त्यांनी केले आहे.