नायजेरीयातील फुलानी जिहाद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Jan-2022   
Total Views |

Nigeria


नायजेरीयन पोलिसांनी ९७ लोकांची सुटका केली. यात डझनभर लहान मुलं आणि १९ नवजात बालकं होती. यात काही पुरूष आणि काही स्त्रियाही होत्या. सगळ्यांच्याच अंगावर फाटके, मळलेले कपडे. कुपोषणामुळे हालहाल झालेले हे लोक. चेहऱ्यावर प्रचंड भीती आणि तणाव. साधारण दोन महिन्यांपूर्वी या सगळ्यांचे अपहरण झाले होते. तेही त्यांच्या गावातून राहत्या घरातून. दोन महिन्यांनंतर या सगळ्यांचा शोध घेत नायजेरीयन पोलिसांनी त्यांची सुटका केली. त्यांच्या सुटकेची बातमी जवळजवळ सर्वच प्रसिद्धीमाध्यमांनी दिली. मात्र, त्यांचे अपहरण का आणि कोणी केले? याबद्दल सविस्तर वृत्तांत देण्याची तसदी कुणीही घेतली नाही. कारण नायजेरीयात हे असे थव्याने लोकांचे अपहरण आणि त्यांच्यावर अत्याचार होतच असतात. पण १९ नवीन जन्माला आलेली बालक या सुटकेमध्ये होती. याचाच अर्थ ज्यावेळी या ९७ लोकांना पकडले गेले त्यात १९ आयाबाया गरोदर होत्या. या अपहरणाचे कृत्य तिथल्या फुलानी या वनवासी जमातीतील एका हिंस्त्रगटाने केले असावे असे म्हटले जाते (पण ते तिथले उघड सत्य आहे). असो. दयामाया आणि करूणेची अपेक्षा सगळ्यांकडून करू शकत नाही. इस्लामच्या नावाने जिहाद करणाऱ्या दहशतवाद्यांकडून तर अजिबात नाही.
 
नायजेरीयातील फुलानी स्थानिक वनवासी गटातील जमात आहे. या फुलानी समाजाच्या हिंसक गटाने या ९७ जणांचे अपहरण केले. का? तर हे ९७ जण गावात स्थायिक होते. गावात त्यांची शेतीभाती आणि जमीन होती. त्यामुळेच त्यांचे अपहरण झाले आणि त्यांचे क्रुरपणे हालहाल करण्यात आले. नायजेरीयतील या संघर्षाला शेकडो वर्षांची पंरपरा आहे म्हणे. पशुपालन आणि वहन हे या मुस्लीम धर्मीय फुलानी गटाचे पारंपरीक काम. पशुपालन करणे, त्यांना चरण्यासाठी नेणे हे सगळे करत असताना फुलानी गट नहेमीच सोबत हत्यारे ठेवत असत. पारंपरीक हत्यार म्हणजे काठी आणि आग उत्पन्न करणारी साधनं. फुलानी आणि स्थानिक ग्रामस्थ यांच्यात संघर्षाची ठिणगी पेटली. कारण पशुधन कुणाच्या शेतात चरते? कुणाच्या मळ्यात जाते? याच्याशी या फुलानींना काही देणे घेणे नसते. रात्रीच्या वेळी वस्ती करण्यासाठी हे उभे शेतही जाळायचे. हे सगळे त्यांच्या अज्ञानामुळे घडे. यावर प्रतिक्रिया म्हणून मग गावातले लोक त्यांचे पशुधन बंदी करायचे किंवा फुलानींना बंदी करायचे. त्यातून मग हिंसेचे द़ृष्टचक्र सुरू झाले. तसेच फुलानी हे जरी वनवासी असले तरी ते कट्टर मुस्लीम. तर, शेतीभाती करणारे स्थानिक हे ख्रिस्ती किंवा बिगरफुलानी जमातीचे वनवासी.
 
पूर्वी केवळ पुशपालन आणि शेतकरी यांच्यात होणारा संघर्ष २१व्या शतकात वेगळ्या वळणावर पोहचला. ‘बोको हराम’ या नावातच ‘हराम’ असलेल्या जिहादी संघटनेने फुलानी गटातील तरूणांना भडकावायला सुरुवात केली. पूर्वी काठी घेऊन पशु चरायला नेणारे फुलानी, आता एके ५७ बंदुक हातात घेऊन पशु चरायला नेऊ लागले. ज्यानंतर स्थानिक ख्रिस्ती शेतकऱ्यांच्या घर आणि शेतीबरोबरच चर्चवरही हल्ले होऊ लागले. ख्रिस्ती मुलींना पळवून त्यांच्याशी जबरदस्तीने विवाह करण्याचे प्रमाणही वाढले. पण हे हल्ले केवळ ख्रिस्ती लोकांवरच होतात, असे नाही तर ‘बोको हराम’ला न जुमानणाऱ्या मुस्लिमांवरही होऊ लागले. थोडक्यात ‘बोको हराम’ने फुलानी गटातील काही तरूणांना जाळ्यात अडकवले आणि त्यांना दहशतवादी बनवले. २०११ सालापासून या गटाने हजारो लोकांचे अपहरण आणि खून केले. यावरून त्यांची निर्दयता समजून येते.
 
नायजेरीयाचे राष्ट्रपती मोहम्मद हे फुलानी समाजाचे आहेत. “ते सत्तेत असूनही फुलानी गटातील तरूण बोको हरामला शरण का जातात? देशात फुलानी सोडून इतर समाजगटाचे शिरकाण का होत आहे? राष्ट्रपती अयशस्वी आहेत. त्यांनी राजीनामा द्यावा...” असे म्हणत काही दिवसापूर्वी हौसा या नायजेरीयातील दुसऱ्या वनवासी समाजगटाने राष्ट्रपती मोहम्मद यांना पत्र लिहिले. त्यानंतर काही दिवसातच पोलिसांनी ९७ निष्पाप लोकांची सुटका केली. मात्र, सुटका झालेले ९७ जण म्हणजे हिमनगाचे टोक आहेत. ‘बोको हराम’शी हातमिळवणी केलेला फुलानी गट पुन्हा केव्हाही त्यांच्यावर हल्ला करू शकतो. ‘बोको हराम’च्या जिहादचे क्रुर पाठबळ असलेली नायजेरीयातील ही हिंसा कधी थांबणार?
 
@@AUTHORINFO_V1@@