जम्मू : जम्मू कश्मीरचे चार माजी मुख्यमंत्री डॉ. फारुख अब्दुल्ला, ओमर अब्दुल्ला, गुलाम नबी आजाद, महबूबा मुफ्ती आणि त्यांच्या संपूर्ण कुटूंबांना मिळणाऱ्या सुरक्षेत मोठी कपात करण्याचा निर्णय लवकरच घेतला जाऊ शकतो. केंद्रीय गृहमंत्रालयाने जम्मू कश्मीर पोलीसांचे विशेष सुरक्षा पथकाला (एसएसजी) विलीन केरण्याच्या विचारात आहे.
राज्य सरकारतर्फे २००० मध्ये स्थापना केलेल्या एसएसजीला विलीन करण्याचा निर्णय केंद्र सरकार आहे. यामुळे जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री, फारूख अब्दुल्ला, त्यांचे सुपूत्र ओमर अब्दुल्ला, गुलाम नबी आजाद आणि मेहबूबा मुफ्ती या सर्वांना याचा फटका बसणार आहे. काँग्रेसचे नेते आझाद वगळता इतर सर्वजण हे श्रीनगरमध्ये राहतात.
सुरक्षा समीक्षा समन्वय समितीने हा निर्णय घेतला आहे.
ही समिती जम्मू आणि काश्मीरच्या महत्वाच्या नेत्यांच्या सुरक्षेसंदर्भात निर्णय घेते. ३१ डिसेंबर रोजी जम्मू-कश्मीर प्रशासनाचे मुख्य सचिव राशिद रैना यांनी यूटी प्रशासन अंतर्गत अतिरिक्त पुलिस महानिर्देशक (एडीजीपी) यांना सुरक्षे संदर्भात माहिती दिली आहे. केंद्र सरकार आता एसएसजीला वेगळा आकार देण्याच्या तयारीत आहे. या चारही नेत्यांची संपूर्ण सुरक्षा आता जिल्हा पोलीसांकडे असणार आहे. ही सुविधा पूर्वीप्रमाणे झेड प्लस श्रेणीतील सुरक्षा असेल.