'बाबू बँड बाजा'चे दिग्दर्शक राजेश पिंजाणी यांचे निधन

चित्रपटासाठी मिळाला होता राष्ट्रीय पुरस्कार

    05-Jan-2022
Total Views |

rajesh pinjani
 
नागपूर : राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट 'बाबू बँड बाजा' या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक राजेश पिंजाणी यांचे मंगळवारी अकस्मात निधन झाले. मुळचे नागपूरचे असलेले राजेश पिंजाणी यांना हृदयविकाराचा झटका आला आणि मराठी चित्रपट सृष्टीने एक उत्कृष्ट दिग्दर्शक गमावला. या चित्रपटासाठी त्यांना तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता. मराठी चित्रपट सृष्टीतील अनेकांनी त्यांच्या अकस्मात जाण्याने हळहळ व्यक्त केली.
 
 
खेडोपाडी असलेले बॅन्डवाले, त्यांच्या आयुष्यातील कठोर संघर्ष राजेश पिंजाणी यांनी 'बाबू बँड बाजा' या चित्रपटात अतिशय चपखलपणे दाखवला आहे. दारिद्र्याचे चटके सहन करीत जगणाऱ्या आई-बाप आणि लहान मुलगा यांच्यामधील ही कथा लोकांना आणि परीक्षकांना चांगलीच भावली. या चित्रपटातील प्रमुख भूमिका अभिनेते मिलिंद शिंदे यांनी साकारली, तर त्यांच्यासोबत मिताली जगताप-वराडकर, विवेक चाबूकस्वार यांच्या प्रमुख भूमिका होत्या.
 
 
राजेश पिंजाणी यांनी त्यांच्या सोशल मीडियावर २०२१ या वर्षाला निरोप देत २०२२च्या स्वागताची एक पोस्ट केली होती. त्याला 'गुड बाय आणि वेलकम' असे असे कॅप्शन देण्यात आले होते. ही पोस्ट अभिनेता, गायक किशोर सौमित्र यांनी पोस्ट केली होती. नम्रता संभेरावसह अनेकांनी सोशल मिडियाद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली.