"संजयजी, जनता एवढी दुधखुळी नाही"

भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांची टीका

    29-Jan-2022
Total Views |

Keshav Upadhye
 
 
मुंबई : महाराष्ट्र सरकारने जनरल स्टोरमध्ये वाईन विक्री होऊ शकते, असा निर्णय दिला. यावरून राज्यभरातून महाविकास आघाडीवर टीका करण्यात आली. मात्र, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी, 'वाईन म्हणजे दारू नाही. सरकारच्या या निर्णयाचा शेतकऱ्यांना फायदा होईल." असे वक्तव्य केले. यानंतर भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी त्यांचाय्वर टीका करताना, 'महाविकासआघाडी सरकार इतके विचित्र निर्णय घेते की त्याचे समर्थन करताना हल्ली संजय राऊतांची विधान व वास्तव यांच्यात काही संबंध दिसत नाही.' असे म्हणत त्यांच्यावर टीका केली आहे.
 
 
 
 
 
भाजप नेते केशव उपाध्ये म्हणतात की, "संजय राऊत यांचा दावा आहे की शेतकरी हितासाठी वाईन विक्रीचा निर्णय घेतला आहे. गेल्या दोन वर्षात शेतकऱ्यावर संकट आली पण सरनाईक दंड माफ करण्यात मग्न असणाऱ्या महाविकास आघाडी सरकारला शेतकऱ्यांच दुःख दिसल नाही. मुख्यमंत्री तर स्वतःच शेतकऱ्यांना बांधावर जाऊन दिलेले वचन विसरले. त्यामुळे राऊत शेतकरी हितासाठी सांगतील आणि जनता विश्वास ठेवेल एवढी दुधखुळी नाही. या निर्णयामागे नेमकं कोणते ‘गणित’ आहे याचा उलगडा होईलच." अशी टीका त्यांनी केली आहे.