फ्रान्सची नवीन ‘डॉक्युमेंटरी’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Jan-2022   
Total Views |

France
फ्रान्सच्या ‘एम-६’ या स्थानिक वाहिनेने ‘फोरबिडन झोन’च्या नावाखाली ‘कट्टरपंथी इस्लामचा धोका आणि फ्रान्स सरकारचे धोरण’ अशी ‘डॉक्युमेंटरी’ प्रसारितकेली आणि नेहमीप्रमाणे तिथल्या मुस्लीम समुदायाने ओरड सुरु केली की, फ्रान्स सरकार आम्हाला लक्ष्य करत आहे, आमच्या धार्मिक भावनांना ठेव पोहोचवत आहे. फ्रान्समध्ये आगामी काळात निवडणुका होणार आहेत. त्यामुळे फ्रान्स प्रशासन मुस्लीम समुदायाविरोधात वातावरण तापवूनफ्रान्सच्या जनतेला भावूक बनवून निवडणुकीचा प्रचार करत आहे. अर्थात फ्रान्ससाठी हे काही नवीन नाही. फ्रान्स सरकारने ही ‘डॉक्युमेंटरी’ का प्रसारित केली असेल? अर्थात फ्रान्स प्रशासनाचे त्यासंदर्भात वेगळे विवेचन आहे. गेल्या काही दशकांपासून फ्रान्स मुस्लीम दहशतवादाने त्रस्त आहे. ‘शार्ली हेब्दो’ प्रकरण तर सगळ्या जगाला हादरवून गेले. फ्रान्सला अभिप्रेत असलेले अभिव्यक्तिस्वातंत्र्य हे मुस्लीम मूलतत्ववाद्यांना अभिप्रेत असणे शक्य तरी आहे का? नाहीच! त्यामुळे ‘शार्ली हेब्दो’ कांड घडले. त्याने अवघा फ्रान्सच नव्हे, तर सगळे जग थरारले. त्यानंतर मात्र जगात अभिव्यक्तिस्वातंत्र्य किती असावे? आणि धर्म, मिथक, श्रद्धा यांच्याबाबत बोलताना कशी आणि किती सावधगिरी बाळगावी, याचे प्रयोगच सुरू झाले. मात्र, त्यानंतरही स्वातंत्र्य आणि मानवी अभिव्यक्तीची आस असणाऱ्या सगळ्यांनी कुठे ना कुठे सर्व धर्म आणि सर्व पंथाबाबत आपले मत मांडणे सोडले नाही. त्याची किंमत त्यांनाही चुकवावी लागली.
 
 
पाश्चात्य राष्ट्र, आशियाई देश असो कीमुस्लीम राष्ट्र, या सगळ्यांमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि धार्मिक कट्टरतेच्या नावावर अधर्माची संकल्पना मांडणाऱ्यांना याही परिस्थितीमध्ये प्रश्न विचारणारे होतेच. आधी सांगितल्याप्रमाणे या सगळ्यांनी प्रश्न विचारले. मात्र, त्यांच्या सगळ्या प्रश्नांना उत्तर मिळाली का? विचारांनी विचारांची लढाई लढली गेली का? तर याचे उत्तर दुर्देवाने नकारात्मकच होते. निदान मुस्लीम दहशतवाद्यांनी तरी प्रश्न विचारणाऱ्यांना हिंसेचेचबळी केले. हीच गोष्ट थोड्याफार फरकाने पाश्चात्य राष्ट्रांतही घडली. जसे कुराणाला प्रश्न विचारणे म्हणजे काही कट्टरतावाद्यांच्या मते धर्माचा अपमान आहे, तसेच बायबलला प्रश्न विचारणे म्हणजे ख्रिस्ती श्रद्धांवर अविश्वास, असेही मत व्यक्त करणारे लोक होतेच आणि आहेत. विचारवंतांचे म्हणणे आहे की, कोणताही धर्म माणसाच्या जगण्याची धारणा सांगतो, माणसाच्या जगण्याला अर्थ देतो, धर्म माणसाला मृत्यू देऊ शकत नाही, धर्म माणसाला वेदना देऊ शकत नाही. असे जर होत असेल तर तो धर्म नव्हे, तर त्या धर्माचे वहन करणारे काही चुकलेले लोक हे पातक करत असतात. असो. तर धर्माच्या बाबतीतले हे वेगवेगळे परिक्षेप मांडण्याचा मुद्दा हा की, फ्रान्समध्ये सध्या मुस्लीम आणि इतर धर्मीय यांमध्ये कमालीची मानसिक दरी निर्माण झाली आहे. कायम एक संशयास्पद वातावरण. या सगळ्याचा परिपाक म्हणून काय फ्रान्स सरकारने धार्मिक पेहरावाबाबत मागे एक कायदाच पारित केला. त्यानुसार सार्वजनिक ठिकाणी तोंड झाकले जाईल यावर बंदी आणली. त्यामध्ये शैक्षणिक संस्था, सिनेमागृह आणि जलतरण तलाव अशा अनेक महत्त्वाच्या ठिकाणांवर तोंड झाकले जाईल, अशी वेशभूषा करण्यास बंदी आणली.
 
 
फ्रान्स सरकारचे म्हणणे आहे, सुरक्षिततेच्या दृष्टीने हा कायदा पारित केला तर फ्रान्सच्या स्थानिक मुस्लिमांचे म्हणणे होते की, आमच्या बुरखा पद्धतीवर बंदी घालण्यासाठी फ्रान्स सरकारने हा कायदा आला. यावर अनेक चर्चाही झाल्या. असो. तर आता फ्रान्स सरकारने कट्टरपंथी इस्लामचा धोका आणि फ्रान्स सरकारचे धोरण ‘डॉक्युमेंटरी’ तयार केली आहे. यात काही मुस्लीम व्यक्तींनीही काम केले आहे. त्यामध्ये लिलिया बौजियान या मुस्लीम महिला कलाकाराने काम केले होते. ‘डॉक्युमेंटरी’वर उठलेल्या चर्चेनंतर लिलियानेही वादात उडी घेतली आणि तिचे म्हणणे की, ती फ्रान्सची मुस्लीम असून या ‘डॉक्युमेंटरी’मध्ये जे काही दाखवले गेले, ते मुळात तसे नव्हते. तिच्या विधानांना तोडून मोडून वेगळेच संदर्भ तयार केले आहेत. ती म्हणते, “मी मुस्लीम असून मुस्लीम कट्टरतेसंदर्भात मी कसे बोलू शकेन का?” यावर फ्रान्सच्या व्यक्तिस्वातंत्र्यवाद्यांना मुद्दा मिळाला. ते म्हणू लागले की, लिलिया पेशाने वकील असूनही तिला तिने केलेल्या भूमिकेबद्दल मत व्यक्त करावे लागते आहे. ती स्वेच्छेने करते की, यातही मुस्लीम कट्टरतेला घाबरून ती असे म्हणते?
@@AUTHORINFO_V1@@