नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नमो अॅपद्वारे देशभरातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. ते म्हणाले की, आज राष्ट्रीय मतदार दिन आहे, मी देशातील सर्व मतदारांचे अभिनंदन करतो. ते म्हणाले की, मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की, मतदानात मोठ्या उत्साहाने सहभागी होऊन ७५ टक्के मतदान व्हावे.
मोदी म्हणाले की, भारतीय राज्यघटनेने असे अधिकार लोकांना दिले आहेत ज्यात देशाचे नशीब बदलण्याची क्षमता आहे. प्रत्येक मताची ताकद इतकी असते की, किती योजना सुरू केल्या जातात आणि त्यातून किती महत्त्वाचे निर्णय घेतले जातात. देशातील जनतेने सातत्याने निवडणुकांच्या माध्यमातून सरकारे स्थापन केली आहेत, ही देशातील प्रत्येक मतदारासाठी अभिमानाची बाब आहे. ते म्हणाले की, यावेळी देश स्वातंत्र्याचा अमृतोत्सव साजरा करत आहे. आम्ही २३ जानेवारीपासून प्रजासत्ताक दिन साजरा करण्यास सुरुवात केली आहे.