चेन्नई : तमिळनाडूतील तंजावरमधल्या १७ वर्षीय विद्यार्थिनीने धर्मांतरासाठी प्रवृत्त केल्या जाणाऱ्या अत्याचारास कंटीळून बुधवारी आत्महत्या केली होती. ९ जानेवारी २०२१ रोजी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. पिडीत मुलीने ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यास नकार दिल्याने हॉस्टेलच्या वॉर्डनने तिचा छळ करून मारहाण केल्याचा आरोप मुलीच्या कुटुंबीयांनी केला आहे.
'तुमच्या मुलीला चांगल्या पदावर पोहोचायचं असेल आणि समाजात सन्मान मिळवायचा असेल तर तिला ख्रिस्ती धर्मात प्रवेश करून आमच्यासारखे बनवा; तरच तिला पुढे शिकायला मिळेल', असे वसतिगृहातील लोकांचे म्हणणे असल्याचे मुलीच्या पालकांनी सांगितले. 'संबंधित प्रकाराबद्दल कोणाला सांगितल्यास मुलीच्या चारित्र्यावर खोट्या अफवा पसरवल्या जातील', असा दबावही टाकला जात असल्याचे त्यांनी पुढे सांगितले.
ख्रिश्चन शाळा सील करण्याची मागणी...
हॉस्टेलचे शौचालय स्वच्छ करणे, जेवण बनवणे अशी अनेक कामे मुलीला करावी लागत होती. मात्र मुलीच्या पालकांनी केलेली तक्रार पोलीस प्रशासनाने गांभीर्याने घेतली नसल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांनी सरकारकडे दोषींना अटक करण्याची विनंती केली असून ख्रिश्चन शाळाही तातडीने सील व्हाव्यात अशी मागणी केली आहे.