मुंबई : राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांचा ‘व्हाय आय किल्ड गांधी’ वादात सापडलायं. खुद्द कोल्हेंच्याच राष्ट्रवादी पक्षातही यातून ठिणगी उडालीयं. खासदार कोल्हे यांनी चित्रपटात नथुराम गोडसेची भूमिका साकारलीयं. "गोडसेची भूमिका म्हणजेच त्याचे समर्थन", असं म्हणत आव्हाडांनी या चित्रपटाला विरोध करू, असं म्हटलं. आता ही भूमिका राष्ट्रवादीची आहे का, असा प्रश्न पडावा तोवर पवारांनीच आव्हाडांना तोंडावर पाडलं.
अमोल कोल्हे यांनी ‘व्हाय आय किल्ड गांधी’ चित्रपटाचा टीझर सादर होऊन तब्बल महिना उलटला. तेव्हा मात्र, याबद्दल कुणालाही खबर नव्हती. अचानक जितेंद्र आव्हाडांना हा साक्षात्कार झाला अन् त्यांनी याबद्दल आक्षेप घेतला!, इतकं साधं हे प्रकरण मुळीच नाहीयं.
एका ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट प्रदर्शित होतोयं. चार आठवडे टीझर प्रकाशित झाल्यानंतरही त्याची काहीच प्रसिद्धी झाली मिळाली नव्हती. चित्रपट प्रदर्शित करण्यापूर्वी त्याची विशेष प्रकारे मार्केटींग करावी लागते. तशी अद्याप चित्रपटाच्या टीमनं काहीचं तयारी केली नव्हती. पण हा वाद उफाळून आला आणि यानिमित्तानं हा चित्रपट मेनस्ट्रीम मीडियामध्ये चर्चेत आलायं.
नेमकं काय घडलं ?
किरण माने प्रकरणात जितेंद्र आव्हाड यांनी गुरुवारी एक पत्रकार परिषद घेतली. याबद्दल काही माध्यमांनी ही मध्यस्ती खासदार कोल्हेंनी घडवून आणली अशा बातम्या दिल्या होत्या.... मात्र, काही वेळानंतर किरण मानेंनी स्वतः सोशल मीडियावर याबद्दलचा खुलासा केला. खासदार कोल्हे तिथे येणार हे त्यांना माहीतीही नव्हतं. ते तिथं चॅनलची बाजू मांडायला पोहोचले होते, असा दावा मानेंनी केला. कोल्हे आणि आव्हाड यांची भेट झाल्याच्या दिवशीच नथुरामच्या भूमिकेबद्दलचं ट्विट आव्हाड यांनी केलं. या दोन घटना एकाच दिवशी घडणं आणि कोल्हे-आव्हाडांची भेट झाल्यावर याबद्दल वाद उफाळून येणं हा सर्व योगायोग आहे का ?
आव्हाड म्हणतात, "डॉ. अमोल कोल्हे यांच्या चित्रपटाचा ट्रेलर पाहून हे स्पष्ट होतंयं की अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसेची भूमिका केलीयं त्यांनी केलेली कृती जरी कलाकार म्हणून केली असली, तरी त्यामध्ये नथुराम गोडसेचे समर्थन आलंचं. कलाकाराचा वेष घेऊन तुम्ही गांधी हत्येचे समर्थन करू शकतं नाही, विनय आपटे ~शरद पोंक्षे ह्यांना ह्या भूमिके बद्दल महाराष्ट्रातील पुरोगामी जनतेनी प्रचंड विरोध केली त्यामुळे त्याच भूमिकेबरोबर राहून या गांधी विरोधी चित्रपटाला विरोध करणार..."
याबद्दल पवारांनी कोल्हेंची पाठराखण केलीयं. ते म्हणातात, "एक कलाकार म्हणून कोल्हेंनी ही भूमिका केली. आपणही त्याच दृष्टीनं पहायला हवं. आव्हाडांनी त्यांचं बोलणं मांडंलंयं. गांधींवरचा सिनेमा तेव्हाही गाजला होता. ज्यानं गोडसेची भूमिका केली तो गोडसे नव्हता. म्हणून त्याच्याकडे कलाकार म्हणूनचं पहावं.", असंही पवार म्हणाले.
नथुरामची भूमिका साकारणाऱ्या अमोल कोल्हेंनी आपली बाजू मांडलीयं, ते म्हणाले, "२०१७मध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण झालं होतं. ज्यावेळी कोणत्याही सक्रिय राजकारणात नसताना मी ही भूमिका साकारलीयं. एखादी भूमिका करतो म्हणजे त्या विचारधारेसोबत सहमत असतो असं कलाकार म्हणून कधीच नसतं. काही विचारांसोबत आपण सहमत असतो.तर काही विचारधारांसोबत सहमत नसतानाही आपण ती भूमिका करतो."