नववर्षाच्या पहिल्याच दिवशी ४०० आदिवासियांचे करणार होते धर्मांतर !

मध्य प्रदेश्तील इंदोरमधील एका जोडप्यावर सामुहिक धर्मांतरण घडवण्याचा आरोप

    02-Jan-2022
Total Views |

MP
 
 
नवी दिल्ली : मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये नववर्षाच्या पूर्वसंध्येला ख्रिश्चन दाम्पत्यावर ४००हून अधिक लोकांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. तेजाजी नगर परिसरात नवीन वर्षाच्या रात्री एका ख्रिश्चन जोडप्याने एका मैदानात सुमारे ४००हून अधिक आदिवासी लोकांना जमा केले होते.मात्र, हिंदु जागरण मंचच्या कार्यकर्त्यांना याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी जात या गोष्टीविरुद्ध विरोध प्रदर्शन केले. घटनास्थळी पोलिस येताच ख्रिश्चन जोडप्याने तेथून पळ काढला.
 
 
नगर निरीक्षक आरडी कणवा यांनी सांगितले की, "अंबामुलिया येथील रहिवासी मनीष आणि त्याची पत्नी यांच्यावर मोठ्या संख्येने लोकांची जमवाजमव केल्याप्रकरणी अनेक कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनीष एक सामाजिक संस्था चालवतो. तो ख्रिश्चन धर्माचा प्रचारकही आहे. नववर्षाच्या रात्री सनवडिया गावातील पॅरामेडिकल कॉलेज मैदानावर सर्व आदिवासी भोजन व प्रार्थनेसाठी एकत्र आले होते." मिळालेल्या माहितीनुसार, नवीन वर्षाच्या निमित्ताने गरीबांसाठी नववर्षाच्या रात्रीच्या भोजनाचे आयोजन केले होते. त्यामुळे सर्वजण मैदानात जमा झाले.
 
 
हिंदु जागरण मंचने याबाबत माहिती दिल्यानंतर पोलिसांना पाचारण केले होते. त्यांनी या भोजन कार्यक्रमात प्रार्थनादेखील बोलून घेण्यात येणार होती, असा आरोप करण्यात आला आहे. नवीन वर्षाच्या पार्टीच्या नावाखाली आदिवासींना मोठ्या मैदानात जमवण्यामागील ख्रिश्चन जोडप्याचा हेतू अद्याप अस्पष्ट असल्याचे पोलिसांनी सांगितले. एकाच ठिकाणी ४०० लोकांना एकत्र करणे हे कोरोना मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. मनीष आणि त्याच्या पत्नीचा शोध सुरू आहे. चौकशीनंतरच त्यांचा हेतू स्पष्ट होईल, अशी माहिती पोलिसांनी दिली. काही काळापासून हे जोडपे धर्मांतरासाठी दबाव आणण्यासाठी सक्रिय होते, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आले आहेत.