नवी दिल्ली : छत्तीसगड पोलीस आणि सीआरपीएफच्या समक्ष सुकमा येथे नऊ महिलांसह चव्वेचाळीस नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. त्यापैकी त्रेचाळीस जण कॅडरच्या खालच्या स्तरातील होते. मेदकाम दुला हा प्लाटून क्रमांक ४ चा सक्रिय सदस्य असून त्याच्यावर दोन लाखांचे बक्षीस असल्याचे उपस्थित अधिकाऱ्यांनी सांगितले. हे नक्षलवादी किस्ताराम, भेजोजी आणि चिंतानलार या भागांत सक्रिय असून चेतना न्याय मंचसारख्या नक्षलवादी संघटनेचे ते सदस्य होते.
राज्य सरकारच्या 'पूना नर्कोम' या नक्षल नर्वसन योजनेस प्रभावित होऊन नक्षलवादी विचारसरणीने ते निराश झाले असल्याचे नक्षलवाद्यांनी सांगितले. त्यांना परत सरळ मार्गावर यायचे असल्याचा दावा सीआरपीएफच्या अधिकाऱ्यांनी केला. 'पूना नर्कोम' योजने अंतर्गत एकूण ३३५ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.