सेवावस्तीतील भगिनींसाठी...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Jan-2022   
Total Views |

सेवाभावाचा वारसा चालवणार्‍या एका लेकीची साधी, पण प्रेरणादायी जीवनकथा म्हणजे नवी मुंबईच्या सुषमा सिंग यांची जीवनकथा...

प्लास्टिक पिशव्यांऐवजी सगळ्यांनी कापडी पिशव्या वापरल्यास प्लास्टिकचा वापर कमी होईल, पर्यावरणाची हानी टळेल, असे तुर्भेच्या सुषमा सिंग यांना वाटले. त्यांनी मग त्यांच्या ‘उत्कर्ष महिला मंडळा’च्या माध्यमातून कापडी पिशव्या तयार करणे, लोकांमध्ये त्या पिशव्या वापरण्यासाठी जागृती करायला सुरुवात केली. त्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विविध आयामांतून त्यांना मार्गदर्शन आणि सहकार्यही लाभले.

नवी मुंबईतील समरसता मोहिमेतील कार्यकर्ते रमेश शिंदे यांनी यासाठी महिलांना शिलाई मशिन्स दिल्या. सुषमा आणि सहकारी महिलांनी जवळ जवळ १ लाख, ४० हजार कापडी पिशव्या बनवून त्या वितरीत केल्या. हजारो मास्कही तयार करुन त्यांचे वितरण केले. त्याव्यतिरिक्त सुषमा यांचे लक्षणीय कार्य म्हणजे त्या नवी मुंबईच्या सेवावस्तीतील महिलांमध्ये मासिक पाळी आणि त्यासंदर्भातली जाणीवजागृती. तसेच त्या आरोग्यविषयक सुविधाही पुरवतात.


विविध लोकांशी संपर्क करत त्यांनी दिघे येथील सेवावस्तीमधील शौचालयात सॅनिटरी पॅडच्या मशिन्स उपलब्ध करुन दिल्या आहेत. आजही सेवावस्तीतील महिलांना औषधांच्या दुकानात जाऊन सॅनिटरी पॅड विकत घेताना लाज वाटते. पण, आता सुलभ शौचालयात ही मशीन बसवल्याने शौचालयातच पॅडची सुविधा उपलब्ध झाली. अशाप्रकारे सेवावस्तीतीलमहिलांना सार्वजनिक शौचालयामध्येच विनामूल्य सॅनिटरी पॅड मिळावेत, यासाठी सुषमा प्रयत्नशील आहेत.



पंतप्रधान मोदींच्या कारकिर्दीमध्ये ‘अंत्यज’ घटकांसाठी आणि समाजाताील शोषित-वंचितांसाठी अनेक सोईसवलती उपलब्ध झाल्या. समाजातील वंचित घटकांमध्ये या सवलती, योजना पोहोचविण्याचे काम सुषमा करतात. सुषमा यांच्या आयुष्याचा मागोवाघेतला तर त्यांच्या जीवनप्रवासातीलप्रवाहीपणा उठून दिसतो. सुषमा सहा महिन्यांच्या असतानाच, त्यांच्या आईचे विमलादेवींचे निधन झाले. मग सुषमा यांचे संगोपन त्यांचे पिता कैलाससिंग राजपूत यांनी केले. आईची उणीव त्यांनी जराही जाणवू दिली नाही.

तुर्भेला सुषमा यांच्या घराशेजारीच त्यांच्या आईच्या मामाचे बब्बनसिंग यांचे घर होते. त्यांना सुषमा ‘बाबुजी’ म्हणत असे आणि बाबुजींच्या पत्नीला ‘माई’ म्हणत. तर बाबुजी आणि माई यांनीही मातृत्वाला पोरके झालेल्या सुषमाला जीव लावला.मुळचे बनारसचे असलेले कैलाससिंग हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक. त्यामुळे घरात समाजशील वातावरण. कैलाससिंग यांचा परिसरात समाजसेवक म्हणून लौकिक. त्यांची पिठाची गिरणी होती.


दुकानही होते. अर्थार्जनाचा व्याप सांभाळत त्यांनी समाजासाठी स्वत:ला वाहून घेतले होते. सुषमा आपल्या पित्याचे सामाजिक कार्य, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे समर्पण जवळून पाहत होत्या. या सगळ्या काळात काही नातेवाईक कैलाससिंग यांना म्हणत, “अरेरे... तुम्हाला एक मुलगीच आहे? मुलगा नाही?” त्यावर कैलाससिंग उत्तर देत, “मुलगा-मुलगी काय म्हणता? माझी मुलगी काय मुलापेक्षा कमी आहे का? ती माझा वारसा चालवेल!”


दिवस जात होते. पण, अचानक सुषमा यांच्या आयुष्याला एक वेगळे वळण मिळाले. त्या १५ वर्षांच्या असतानाच त्यांच्या वडिलांचा अचानक मृत्यू झाला. सुषमा यांना वाटले आता आपणही मरणार. आपले कुणी नाही. जीव द्यावा का? पण, वडिलांच्या अंत्ययात्रेला आणि त्यानंतरही किती तरी दिवस शेकडो लोक सुषमा यांना भेटायला येत राहिले. कैलाससिंग किती चांगले होते आणि त्यांनी आम्हाला कशी मदत केली, हे ते सांगत राहिले. आपले वडील शरीराने सोबत नाहीत, पण त्यांच्या चांगल्या विचारांनी आणि चांगल्या कार्याने जीवंत आहेत, असे सुषमाला वाटते. ‘माझी मुलगी माझा वारसा चालवेल’ हे वडिलांचे वाक्य ध्यानी घेता सुषमा यांनीही ‘मला हा चांगल्या कृत्याचा वारसा चालवायलाच हवा,’ असे मनोमन पक्के केले.


आत्महत्येचा विचारही त्यांनी सोडून दिला. पुढे बनारसहून सुषमा यांचे काका आले. ‘आईवडिलांविना सुषमा काय करणार? तिची दहावीची परीक्षा बनारसहून देईल ती. एक वर्ष राहू द्या तिला इथे, नाही आवडले तर पुन्हा तुर्भेलापरत येऊ द्या,’ असे त्यांनी तुर्भेतल्यासुषमा यांच्या बाबुजी आणि माईंना सांगितले. पण, बनारसला गेल्यावर मात्र सुषमा यांच्यापुढे काहीतरी वेगळेच वाढून ठेवले होते. सुषमाचे काका तिला सांगत “तुझ्या वडिलांनी तुझ्या नावावरकेलेली संपत्ती माझ्या नावावर कर, तरच तुझ्या शाळेची फी, चप्पल किंवा दैनंदिन वापराच्या वस्तू देईन.”आणि त्यांनी तसे केलेही. त्यामुळे उत्तर प्रदेशाच्या कडाक्याच्या थंडीत सुषमाकडे गरम कपडे नव्हते.


दोन किलोमीटर दूर असलेल्या शाळेत ती अनवाणी जायची. बापाची एकुलती एक मुलगी सधन वातावरणातलाडाकोडात वाढलेली. तिला हे सगळे असह्य होत होते. पुढे सुषमा यांनी ठरवले की, आपण आपल्या वडिलांचा वारसा पुढे चालवायचा. त्यांची दुकान, पिठाची गिरणी चालवायची. पण, त्यावेळी पिठाच्या गिरणीतलीमशीन विजेमुळे जळाली होती. नुकतीच दहावीझालेल्या सुषमा यांनी खूप प्रयत्न करून ती पिठाची गिरणी पुन्हा सुरू केली. या सगळ्या काळात सेवावस्तीमध्ये सेवाकार्य सुरूच होते. पुढे त्यांचा विवाह विमलेश सिंग यांच्याशी झाला. दोन अपत्य झाली. लहान मुलांना वेळ देणे गरजेचे होते. मुलं थोडी मोठी झाली.

२०१७ साली सुषमा यांनी मग पूर्णत: समाजकार्यात उतरायचे ठरवले. त्या राष्ट्र सेविका समितीशी जोडल्या गेल्या. याच काळात त्यांनी ‘उत्कर्ष महिला मंडळा’ची स्थापनाही केली. आज नवी मुंबई परिसरात सुषमा सिंग यांची ‘सेवाभावी समाजसेविका’ म्हणून चांगली ओळख आहे. आगामी काळात नवी मुंबईतील प्रत्येक सार्वजनिक शौचालयात विनामूल्य सॅनिटरी पॅडच्या मशीन त्यांना उपलब्ध करुन द्यायच्या आहेत. सेवावस्तीतील माता-भगिनींचे आयुष्यमान सर्वार्थाने उंचवायचे आहे. आयुष्यात आलेल्या कोणत्याही प्रसंगाला न डगमगता, केवळ सकारात्मक जगणे जगणार्‍या सेवाभावी सुषमा सिंग यांचे जीवन म्हणजे आईवडिलांचा वारसा चालवू इच्छिणार्‍या प्रत्येक लेकीसाठी प्रेरणा आहे.


९५९४९६९६३८
@@AUTHORINFO_V1@@