मुंबई: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मोदींबाबतच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. भाजप कार्यकर्त्यांकडून पटोलेंविरोधात राज्यभरात आंदोलन करण्यात आले. पंजाबमध्ये फसलेला कट महाराष्ट्रात शिजतोय का? मोदींच्या हत्येच्या कटाला राहुल गांधींची मूक सहमती आहे का? असा सवाल भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी काँग्रेस हायकमांडलाच केला आहे.
‘नाना पटोले यांच्या वक्तव्यावर काँग्रेस हायकमांड गप्प का आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येच्या कटासाठी राहुल गांधी यांची सहमती आहे काय? पंजाबमध्ये फेल झालेला कट महाराष्ट्रात शिजतोय का? आमचा महाविकास आघाडी सरकारच्या पोलिसांवर विश्वास नाही. या प्रकरणाचा तपास केंद्रीय यंत्रणांकडे दिला जावा’, अशी मागणी चित्रा वाघ यांनी ट्विटरद्वारे केली आहे.
तसेच, ‘मोदींना मारू शकतो शिव्या देऊ शकतो’ म्हणणा-या नानांनी तालिबान्यांचा पक्ष जॅाईन केलाय की काँग्रेस पक्षानंच तालिबानी संघटनेशी युती केलीय.. मोदीजी केवळ भाजपचे नेते नाहीत तर देशाचे सन्माननीय पंतप्रधान आहेत हे विसरू नका. नानाभाऊ, मंत्रीपद मिळत नसल्याचा राग कुठेही काढू नका..! असा टोलाही चित्रा वाघ यांनी नाना पटोलेंना लगावला होता.