पवारांच्या गुगलीनं राऊत पडले उघडे!

उत्तर प्रदेशात एकट्यानं निवडणूका लढवण्याची वेळ!

    13-Jan-2022
Total Views |

Sharad Pawar Sanjay Raut 1
 
 
 
मुंबई : महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार असून तिन्ही पक्षांच्या एकाही नेत्याने यूपी निवडणुकीत एकत्र लढण्याचे बोलले नाही. शिवसेनेकडूनही याबाबतीत गुरुवारी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. 'कोणत्याही पक्षाशी युती न करता आम्ही निवडणूक लढवणार', अशी घोषणा खासदार संजय राऊत यांनी केली.
 
 
उत्तर प्रदेशच्या पश्चिम विभागाच्या दौऱ्यावर जाण्यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 'आम्हाला यूपीमध्ये बदल हवा आहे. मात्र आम्ही कोणाशीही युती करणार नाही. सपापेक्षा आमची विचारधारा ही वेगळी आहे. भाजप आणि आम्ही एकाच विचारसरणीचे आहोत. मात्र आमच्यामुळे भाजपला त्रास होऊ नये यासाठी आम्ही आजपर्यंत युपीच्या निवडणुकीत उतरलो नाही.', असे राऊत यांनी सांगितले. 'मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा आम्ही आदर करतो. ते इतके ताकदवान नेते आहेत की त्यांनी कुठूनही निवडणूक लढवली तरी ते जिंकतील.', असे म्हणत त्यांनी योगी आदित्यनाथ यांचे कौतुकही केले.
 


 
यूपीच्या निवडणूकीत एकीकडे शरद पवार हे शिवसेनेला बाजूला सारत असल्याचे दिसत आहे. तर दुसरीकडे मविआतील अग्रेसर पक्ष शिवसेना कोणासोबतही युती न करता निवडणूक लढवणार आहे. यावरून मविआचे लागेबांधे हे फक्त महाराष्ट्रापुरतेच सीमित असल्याचे दिसत आहे.