ग्रॅमी पुरस्कारासाठी नामांकित अमेरिकेतील कृष्णभक्त

लहानपणापासूनच श्रीकृष्णाचा आदर, हिंदू धर्मावर लिहिली अनेक पुस्तके

    10-Jan-2022
Total Views |

Achyuta Gopi
 
 
नवी दिल्ली : सातासमुद्रापार अमेरिकेत राहणारी अच्युता गोपी या भगवान श्रीकृष्णाच्या भक्तीमुळे चांगल्याच प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यांनी गायलेले श्रीकृष्णाचे भजन ऐकण्यासाठी अनेकजण दूरदूरवरून श्रोते येतात. ग्रॅमी पुरस्कारांसाठी नामांकन मिळालेल्या अच्युता गोपी यांचा हिंदू धर्मावर विश्वास आहे. त्यांच्यासोबत त्यांचे कुटुंबही श्रीकृष्णाचे भक्त आहे. तसेच, त्यांचे आध्यात्मिक विषयांवर लेखनदेखील प्रसिद्ध आहे. त्यांना गाणी लिहिण्याची खूप आवड असल्याचेदेखील त्या सांगतात. त्यांनी लिहिलेल्या आणि गायलेल्या भक्तिगीतांसाठी अनेक पुरस्कार मिळाले.
 
 
अच्युता गोपी सांगतात की, भजन कीर्तनातून भगवंताची आराधना करणे हे तिने आपल्या जीवनाचे ध्येय बनवले आहे. लहानपणापासून तिची भगवान श्रीकृष्णावर खूप श्रद्धा आहे. त्याचे कुटुंबीयही यामध्ये तिला मदत करतात. याबद्दल त्या सांगतात की, "माझ्या कुटुंबाच्या आणि शिक्षकांच्या आशीर्वादामुळे मी आज इथपर्यंत पोहोचलो आहे. मला संपूर्ण जग फिरण्याची संधी मिळाली. मला गाणे आणि लिहायला आवडते." त्यांनी 'प्रेम माला' नावाचे एक पुस्तक देखील लिहिले आहे. या पुस्तकासाठी त्यांना अध्यात्मिक श्रेणीतील '२०२० नेक्स्ट जनरेशन इंडी बुक पुरस्कार' देखील मिळाला आहे.