तालिबानचा नवीन आदेश; अफगाणिस्तानात शिक्षण घेणाऱ्या महिलांसाठी काय आहेत नियम?

तालिबानचा नवीन आदेश; अफगाणिस्तानात शिक्षण घेणाऱ्या महिलांसाठी काय आहेत नियम?

    06-Sep-2021
Total Views | 69
TALI_1  H x W:
 
 
काबूल: अफगाणिस्तानात तालिबान परत आल्यानंतर परिस्थिती बदलू लागली आहे. तालिबानने असे आदेश जारी केले आहेत की, विद्यापीठात जाणाऱ्या महिलांना पारंपरिक कपडे आणि त्यांच्या चेहऱ्याचा बहुतांश भाग झाकलेला नकाब घालणे आवश्यक आहे. मुला-मुलींचे वर्ग स्वतंत्रपणे चालवण्याचे किंवा त्यांच्यामध्ये पडदा लावण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
 
 
तालिबान राजवटीनंतरचे हे पहिलेच चित्र आहे, जे काबूलमधील इब्न सीना विद्यापीठाने सांगितले आहे. ज्यामध्ये वर्गात एकत्र बसलेल्या मुला-मुलींना मध्यभागी ठेवण्यात आले आहे, जेणेकरून ते एकमेकांना पाहू शकणार नाहीत किंवा बोलू शकणार नाहीत.
अफगाणिस्तानात महिला सतत तालिबानकडून त्यांच्या हक्कांची मागणी करत असतात. पण, तालिबान आपल्या विचारांशी एकनिष्ठ असल्याने महिलांना पाहिजे तसे स्वातंत्र्य देण्यास नकार दिला आहे. तालिबानच्या विरोधात काही महिलांनी आवाज उठविण्याचा प्रयत्न केला. पण, तालिबानने त्या महिलांवर अत्याचार केल्यामुळे स्थानिक महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121