मुंबई : जावेद अख्तर यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात जर शिवसेनेला आक्षेप आहे, तर त्यांची राज्यात सत्ता असतानाही २४ तास उलटून त्यांच्यावर अटकेची कारवाई का होत नाही, असा प्रश्न भाजप आमदार राम कदम यांना विचारला आहे. राम कदम म्हणाले, "आजच्या 'सामना' वृत्तपत्रात उल्लेख केल्यानुसार, जावेद अख्तर यांचे विधान हे आक्षेपार्ह आहे, असं म्हटलं. पण २४ तास उलटूनही जावेद अख्तर यांच्यावर अटकेची कारवाई का होत नाही," असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.
"सत्तेत बसलेल्या शिवसेनेनं आणि राज्य सरकारने याचे उत्तर द्यावे. जावेद अख्तर यांनी केलेल्या वक्तव्याची माफी मागावी. त्यांनी भारतातील व्यवहार पाहिला आहे. जावेद अख्तर यांनी अफणागिस्तानला जावे. तेव्हा त्यांना कळेल भारत आणि तालीबानमधील फरक काय आहे.", असे कदम म्हणाले.
“जिलेबीसारखी गोल गोल भाषा? एका ठिकाणी शिवसेना मान्य करते आहे की जावेद अख्तर यांनी चुकीचे विधान केले आहे. मग वाट कसली पाहताय? आम्ही तक्रार करून २४ तास होऊनही त्यांना अटक का करत नाही? हिंम्मत असेल तर ठोका बेड्या? त्याच्या घरासमोर, राडा करण्यापासून कोणी रोखले तुम्हाला?”, असा प्रश्न राम कदम यांनी विचारला आहे.